‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर जवानांना सलाम करत तेल्हाऱ्यात ‘तिरंगा यात्रा’ रॅली.
भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुका.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर जवानांना सलाम करत तेल्हाऱ्यात ‘तिरंगा यात्रा’ रॅली.
भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुका.

भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने आज दिनांक 17 मे 2025 शुक्रवार रोजी संध्याकाळी 5 वाजता’ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखवलेल्या भारतीय जवानांच्या शौर्य व बलिदानाला सलाम करण्यासाठी तेल्हारा शहरातील उंबरकार कॉम्प्लेक्स येथून भव्य ‘तिरंगा यात्रा’ मोटरसायकल बाईक रॅलीचे आयोजन काढण्यात आली.

तेल्हारा शहरातील शेगाव नाका, संत तुकाराम महाराज चौक, टॉवर चौक, पोलीस स्टेशन रोड संताजी चौक, प्रताप चौक मालेगाव नाका, बजरंग चौक, संभाजी चौक, श्रीशिवाजी चौक, आठवडी बाजार ,सराफ लाईन या मार्गाने भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषाने रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीचे समारोप झाले. या रॅलीचे नेतृत्व तेल्हारा तालुका भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष गणेश रोठे यांनी केले.या तिरंगा यात्रेला भाजपा चे आजी-माजी पदाधिकारी,युवा मोर्चा व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.