तेल्हारा टॉवर चौकात विहिंप -बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचेआमरण उपोषण.
पशुधन चोऱ्या, गोमांस विक्री इत्यादी सह विविध मागण्या.
तेल्हारा टॉवर चौकात विहिंप -बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचेआमरण उपोषण.
पशुधन चोऱ्या, गोमांस विक्री इत्यादी सह विविध मागण्या.

तेल्हारा तालुक्यासह ग्राम वाडी आदमपूर ,माळेगाव, वाडी इसापूर, जाफरापूर, शेरी येथील गोमांस विक्री, पशुधन चोऱ्या संदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी या अगोदर दिलेल्या अनेक निवेदनावरून कार्यकर्त्यांवर सक्तीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ तेल्हारा येथील टॉवर चौकात शनिवार दि.१७मे२०२५ सकाळी १० वाजेपासून विहिंप-बजरंग दलाचे५ कार्यकर्ते आमरण उपोषणास बसली आहेत.
उपोषणाला बसण्या अगोदर गुरुवारी दिनांक १५मे२०२५ रोजी पोलीस अधीक्षक आकोट विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी ठाणेदार तेल्हारा, तहसीलदार तेल्हारा, मुख्य कार्यकारी अधिकारी तेल्हारा यांना देण्यात आल्या आहेत.
तालुक्यात खुली गोवंश विक्री व गोवंश चोऱ्या होत असून पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पशुधन चोऱ्या, गोवंश मास विक्रीचे प्रकार वाढले असल्याचा स्पष्ट आरोप सदर निवेदनातून करण्यात आला आहे. विहिंप-बजरंग दल कार्यकर्ते, गोरक्षक यांनी प्रशासनाला मदत करूनही सातत्याने कार्यकर्त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक जसे की,’ विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने हिंदू धर्माचा ठेका घेतला आहे काय’? असे बोल गोवंश पकडल्यावर गोरक्षकांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकावे लागत आहेत. असा आरोप निवेदनात करत न्यायार्थ आज १७ मे सकाळ पासून आमरण उपोषणाचा मार्ग कार्यकर्त्यांना स्विकारला आहे.उपोषण सुरू केले तेव्हा पासून दिवसभर उपोषण कर्ताचे समर्थन करण्यासाठी विविध प्रकारचे नागरिकांनी भेटी देवून पाठींबा दर्शविला.