शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन.
पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन. श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा.
शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा.
तेल्हारा दि. –
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.एस.राठोड हे होते तर अतिथी म्हणून आजीवन सदस्य सर्वश्री साहेबराव सोनमाळे, रमेशराव कोकाटे,मुन्ना मिरसाहेब,अॅ विश्वासराव नेरकर,शाळा तपासणी अधिकारी उद्धवराव विखे , गजानन पाटील मार्के, सुभाष ढोले, सुहासराव कराळे, गजानन भारसाकळे, सौ प्रेरणाताई कराळे मॅडम,सौ विद्या ताई देशमुख, गजानन गावंडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज व शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येवून मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने आजीव सदस्य मुन्ना मिरसाहेब यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रम चे सुञसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी तर आभार बळीराम कुवारे यांनी व्यक्त केले.