बेलखेड येथे 17-18 एप्रिल ला पुन्हा भव्य शंकरपट.
महाकाल शंकर पट समिती व गावकरी यांचे आयोजन.
बेलखेड येथे 17-18 एप्रिल ला पुन्हा भव्य शंकरपट.
महाकाल शंकर पट समिती व गावकरी यांचे आयोजन.

बेलखेड – अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील बेलखेड हे गाव विविध खेळ व क्रीडा स्पर्धा घेण्यात नावाजलेले गाव आहे. या ठिकाणी कबड्डी च्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात येथील कबड्डी संघ विदर्भात नावाजलेला आहे. तसेच येथे विविध नाट्य, कला, संस्कृती जपली जायची येथील अखाडी मधील कला व कलावंत प्रसिद्ध होते त्याच प्रमाणे येथे शंकर पट प्रेमीची संख्या पुर्वीपासून चालत आली आहे. येथील शंकर पट प्रेमी स्व. रामकृष्ण अरूडकार, शंकरराव पारिस्कार,जगन्नाथ साखरे, जगतराव टोहरे,नारायणराव इंगळे,मारोती इंगळे,जगन्नाथ पाटील, ज्ञानदेवराव बेंदरकार, हमजु भाई, मस्तानसेठ, शंकरआप्पा इत्यादी शंकर पट प्रेमींनी चालवत आणलेली परंपरा आजही बेलखेड येथे सुरू आहे.
मार्च महिन्यात नुकतेच शंकर पट आयोजन झाले होते आता पुन्हा महाकाल भव्य शंकर पटाचे आयोजन केले गेले आहे. दिनांक 17-18 एप्रिल 2025 ला दोन दिवस राज्यभरातील शंकर पट प्रेमी येथे सहभाग घेणार असल्याचे समजले. महाकाल शंकर पट समिती व बेलखेड ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य शंकर पटाचे आयोजन केले आहे. या भव्य शंकरपट मध्ये लाखों रूपयांच्या बक्षिसांची लयलूट ठेवली आहे. तरी शंकरपट प्रेमी व नामांकित बैल धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलखेड ग्रामस्थ आयोजकांनी केले आहे.
बेलखेड येथील पालीवाल यांच्या हिवरखेड रस्त्यावरील, श्री संत गजानन महाराज मंदीर पुढील शेतात दि. 17-18 एप्रिल ला आयोजित शंकरपटाचे उद्घाटन डॉ.अभयदादा पाटील, विकास राणे नायब तहसीलदार तेल्हारा यांच्या शुभहस्ते गजाननराव उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री आकाश फुंडकर,युवा खासदार अनुप धोत्रे, मतदारसंघ आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, महेश गणगणे,डॉ.रणजीत पाटील,अनिल गावंडे, सुखदेवराव सुशिर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
हि शंकरपट स्पर्धा अ , क व गावगाडा गटात होणार असून या साठी वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस राहणार आहेत. अ गटात 52 हजार पासून ते 3 हजार पर्यंत बारा बक्षिसे उतरत्या क्रमाने राहणार आहेत तसेच क गटात सुद्धा 31 हजार पासून ते 1 हजार पर्यंत उतरत्या क्रमाने एकुण 11 बक्षीस तथा गावगाडा गटात सुद्धा बक्षिसाची लयलूट होणार आहे. स्पर्धेत बैल जोडी प्रवेश फी अ गट एक हजार पाचशे व क गट एक हजार व गावगाडा पाचशे रुपये राहील तरी शंकरपट प्रेमी व पट बैल धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे महाकाल भव्य शंकर पट समिती व समस ग्रामस्थ शेतकरी बेलखेड यांनी कळविले आहे.
शंकरपट स्पर्धा विविध शासनाच्या नियम व अटींच्या अधिनस्त राहतील त्यामुळे शंकरपट प्रेमी पट बैल धारकांनी खबरदारी घ्यावी. या शंकरपट मध्ये घड्याळ मालक राजुभाऊ मन्नाडे येडगाव हे काम पाहतील.