आपला जिल्हा अकोला

तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे “पत्रकार भवन वाॅलकंम्पाउंड व परिसरात पेव्हर ब्लॉक 60 लक्ष रूपयाचे कामाचे लोकार्पण सोहळा” अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते संपन्न. 

तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे "पत्रकार भवन वाॅलकंम्पाउंड व परिसरात पेव्हर ब्लॉक 60 लक्ष रूपयाचे कामाचे लोकार्पण सोहळा" अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते संपन्न. 

तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे “पत्रकार भवन वाॅलकंम्पाउंड व परिसरात पेव्हर ब्लॉक 60 लक्ष रूपयाचे कामाचे लोकार्पण सोहळा” अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते संपन्न. 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ र. न. 7030 शाखा – तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे पत्रकार भवन मधील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आयोजित “पत्रकार भवन वाॅलकंम्पाउंड व परिसरात पेव्हर ब्लॉक चे 60 लक्ष रूपयाचे कामाचे लोकार्पण सोहळा” मतदारसंघाचे आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले.

प्रबोधन काॅलनी,सिद्धीविनायक नगर, तेल्हारा मधील पत्रकार भवन येथे आयोजित लोकार्पण सोहळा व्यासपीठावर आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे, नगराध्यक्षा सौ. वैशाली जितेंद्र पालीवाल, उपाध्यक्ष सचिन तायडे, मुख्याधिकारी सतीश गावंडे,पत्रकार संघाचे प्रल्हादराव ठोकणे उपस्थित होते. सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटो चे पूजन करण्यात आले. दरम्यान रीतसर फीत कापून आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे यांनी केला तर नगराध्यक्षा सौ. वैशाली पालीवाल यांचा सत्कार पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य सुरेशराव शिंगणारे यांनी केला, मुख्याधिकारी सतिश गावंडे यांचा सत्कार अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सहचिटणीस सत्यशील प्र. सावरकर यांनी केला. संचालन पत्रकार संघाचे रामभाऊ फाटकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत विखे यांनी केले.यावेळी तेल्हारा नगर परिषदेचे सर्व सदस्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, सरचिटणीस प्रमोद भाऊ लाजुरकर तथा सर्व कार्यकारणी सदस्य अकोला जिल्हा पत्रकार संघ यांनी तसेच तेल्हारा तालुका पत्रकार संघ पदाधिकारी सदस्य- प्रल्हादराव ठोकणे,सुरेशराव शिंगणारे, सत्यशील प्र. सावरकर, अनंतराव अहेरकर, प्रा कृष्णा फंदाट सर,सदानंद खारोडे, धर्मेश चौधरी, प्रशांत विखे, अनिल अवताडे, प्रा विद्याधर खुमकर,अनिल जोशी, निलेश जवकार, शामशील भोपळे, दत्तात्रय बिहाडे, रवि शर्मा, सुरेश सिसोदिया, राहुल मिटकरी, अमित काकड, संदीप सोळंके, विशाल नांदोकार,विलास बेलाडकर यांनी पत्रकार भवन उभारण्यात तसेच वाढीव कामास निधी देवून भरभरून सहयोग दिल्याबद्दल आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे साहेब व नगर परिषद तेल्हारा यांचे शब्दसुमनानी स्वागत करून आभार व्यक्त केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!