तेल्हारा शहराचे आराध्यदैवत श्री गौतमेश्वर मंदीर. – पुरातन महादेव संस्थान पायविहीर म्हणूनही प्रसिद्ध.
- ईसवी सन १६९७ ची नोंद.
तेल्हारा शहराचे आराध्यदैवत श्री गौतमेश्वर मंदीर.
– पुरातन महादेव संस्थान पायविहीर म्हणूनही प्रसिद्ध.
– ईसवी सन १६९७ ची नोंद.
तेल्हारा- दि. (सत्यशील सावरकर)

तेल्हारा जिल्हा अकोला (महाराष्ट्र) शहरातून वाहणाऱ्या गौतमा नदी तीरावर पुरातन महादेव संस्थान पायविहीर गौतमेश्वर मंदीर भाविकांचे आस्थेचे श्रद्धास्थान आराध्यदैवत आहे. या पुरातन श्री महादेव संस्थान ची स्थापना ईसवी सन १६९७ धर्मस्थळ र. नं. ७६७ आहे. शिलालेख व इतर बाबी वरून लक्षात येते कि हे मंदीर प्राचीन काळातील असून शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. पुरातत्त्व विभागानुसार हे शिवलिंग १२०० वर्षापुर्वीचे आहे. श्री महादेव मंदीर गौतमा नदीच्या तीरावर वसले असल्यामुळे गौतमेश्वर संस्थान सुद्धा संबोधले जाते. वैशिष्ट्ये पुर्णबाब म्हणजे गौतमा नदी पश्चिम दिशे कडून मंदीराच्या पायथ्याशी पुर्वेला स्पर्श करून पुढे दक्षिणेस वाहत जाते. गौतमा नदी पुढे वाहत जाऊन तिर्थक्षेत्र श्री वांगेश्वर येथे त्रिवेणी संगम पुर्णा – विद्रुपी- गौतमा ला जाते.

अकोला जिल्ह्यातील अती प्राचिन स्थळ असे आहे जिथे श्री महादेव स्वयंभू शिवलिंग मंदीर व पायविहीर आहे. या पायविहीर चे बांधकाम वरून ती पुरातन काळातील असल्याचे दिसून येते. या मंदीर परिसरात ही पायविहीर असल्याने श्री महादेव संस्थान पायविहीर सुद्धा बोलले जाते. मंदिरात श्री संत गजानन महाराज यांचे पदस्पर्श झाल्याचे सांगितले जाते तसेच झाशी पळशी येथील श्री शंकर गिरी महाराज यांनी या ठिकाणी रोठाचा प्रसाद सुरू केला असून हा प्रसाद ११ किलो पासून ते आता १५१ किलो चा बनविला जातो व प्रसाद म्हणून वाटल्या जातो.

तेल्हारा शहरासह पंचक्रोशीतील जनतेचे आस्था- श्रद्धास्थान, आराध्यदैवत असलेल्या पुरातन श्री महादेव संस्थान पायविहीर, श्री गौतमेश्वर मंदीरात महाशिवरात्री पर्वात विविध प्रकारचे धार्मिक उत्सव होतात. या दिवशी मोठी यात्रा भरते. हजारो भक्तगण गौतमेश्वराला अभिषेक घालतात.

श्री गौतमेश्वर मंदीरात वर्षभरातील धार्मिक उत्सव.
महाशिवरात्रीला भागवत सप्ताह, अभिषेक, होम हवन, महापूजाअर्चा, यात्रा महोत्सव, रोठाचा प्रसाद, भव्य महाप्रसाद होतो.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वट सावित्री पोर्णिमा पर्यंत शिवलिंगावर अखंड थंड पाण्याची थेंब थेंब गळती लावण्यात येते.
श्री हनुमंताची येथे प्रतिष्ठापना असल्याने या ठिकाणी दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी विविध धार्मिक विधी केला जातो तसेच प्रत्येक मंगळवारी व शनिवारी बहूसंख्य भाविकांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण केली जाते.
या ठिकाणी प्राचीन काळातील वटवृक्ष, पिंपळ, निंब त्रिगुणी आहे. पुरातन त्रिगुणी असल्याने शहरातील महिला येथे मोठ्या संख्येने वटपौर्णिमा वट सावित्री पूजना साठी येतात.

अति पुरातन श्री महादेव मंदीर व स्वयंभू शिवलिंग असल्याने श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते. महिन्यातील प्रत्येक सोमवारी पूजाअर्चा अभिषेक भक्त येतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी मंदीर संस्थानची पालखी व कावड यात्रा निघते. संपूर्ण शहरात पालखीचे पूजन करून शहरात भक्तीमय वातावरण होवून महिला आप आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून पूजाअर्चा करतात. शहरातील विविध कावळ मंडळी सोमवारी श्री महादेवाला श्री क्षेत्र त्रिवेणी संगम वांगेश्वर येथून जल आणून जलाभिषेक करतात.
पोळ्याच्या दिवशी शेतकरी राजा आपल्या सर्जा राजाला बैल पोळा श्री महादेव दर्शनासाठी आणून साजरा करतात.

मंदीरात देव दिवाळीला दीपोत्सव साजरा केला जातो. वामन एकादशीला शहरातील विविध धार्मिक स्थळ मंदीरांची सामुहीक पालखी वाजत गाजत शहरातून निघते. दरवर्षी अशा प्रकारचे विविध धार्मिक उत्सव श्री महादेव संस्थान गौतमेश्वर मंदिरात उत्साहाने साजरे केले जातात.
या ठिकाणी सर्व शिव भक्तांचे सहयोग सहकार्यातून मंदीर जिर्णोद्धार काम सुरू आहे. पुढील बांधकाम व इतर मंदीरकामी देणगीदार यांनी स्व:इच्छेप्रमाणे मदत करण्याचे सांगण्यात येत आहे.