पुर्णा-विद्रुपा-गौतमा त्रिवेणी संगमावर वसले वांगेश्वर महादेव.
- महाशिवरात्री महोत्सवात भाविकांची मांदियाळी.

पुर्णा-विद्रुपा-गौतमा त्रिवेणी संगमावर वसले वांगेश्वर महादेव.
– महाशिवरात्री महोत्सवात भाविकांची मांदियाळी.
तेल्हारा – (सत्यशील सत्यशील)
तेल्हारा तालुका जिल्हा अकोला (महाराष्ट्र) पुर्णामायच्या कुशीत विद्रुपा, गौतमा सामावल्या त्या वांगेश्वर त्रिवेणी संगमावर पुरातन असे भक्तांचे श्रद्धास्थान श्री वांगेश्वर महादेव मंदीर आहे.पुर्णाकाठ चा नयनरम्य परिसर, भव्य मंदीर वास्तु, त्रिवेणी संगम असल्यामुळे भाविकांची महाशिवरात्री पर्व, पुरूषोत्तम मास, श्रावण मासात दर्शनासाठी जिल्हाभरातील तसेच दुसऱ्या राज्यातील भाविकांची मोठी गर्दी असते. सोमवती अमावास्या पर्वात या ठिकाणी स्नान करण्याची मंहती असल्याने व नारायण नागबली, कालसर्प पूजा येथे होते.

पुर्णा विद्रुपा गौतमा त्रिवेणी संगम असल्यामुळे या ठिकाणी अस्थी विसर्जन व उत्तर क्रीया पूजाअर्चा येथे केली जाते त्यामुळे वर्षभर या ठिकाणी विविध पूजाअर्चा कार्यक्रम पार पडतात.महाशिवरात्री पर्वात येथे मोठी गर्दी असते विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भव्य अशी यात्रा भरते पंचक्रोशीतील नागरिकांची मांदियाळी असते. तसेच श्रावण महिन्यात कावळधारी त्रिवेणी संगमावरील जल महादेव व शिवलिंग अभिषेक करण्यासाठी नेतात. श्रावणातील पाच ही सोमवारी कावळधारी जल घेण्यासाठी येतात. श्रावणातील सोमवारी सुद्धा गर्दी राहते.

भाविक भक्त त्रिवेणी संगमावर स्नान केल्या नंतर श्री वांगेश्वर महादेव,भव्य पाशानी शिवलिंगाचे दर्शन, नंदी पूजन करतात. या मंदिरात पूजाअर्चा गीता स्वामी करित होते. त्यांचे पश्चात स्वामी कमलेशानंद सरस्वती देखभाल करीत. या मंदिराचा कारभार शांताश्रम संस्थान पाहते.मंदीर परिसरात भव्य असे सुविधा युक्त गोशाळा बांधलेली आहे. परिसरातील नागरिक सुद्धा या गोशाळेला मदतीचा हात देत असल्याचे समजले.
या ठिकाणी त्रिवेणी संगम असल्यामुळे जळगांव, संग्रामपूर,खामगाव शेगाव,अकोट,तेल्हारा तालुक्यातील नागरिक अस्थी विसर्जन करतात. या ठिकाणी विसर्जन करताना मात्र नदी पात्रात नागरिकांना त्रासदायक ठरते. नदीपात्रात घाट नसल्याने पावसाळ्यात खूप कष्ट पडतात. उंच माथा असल्याने खाली उतरताना पायऱ्या नसल्याने कित्येक लोक पडतात. त्यामुळे घाट बांधला जावा अशी मागणी आहे.
मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी मंदीर तट रक्षक भिंत उभारणी व मुख्य आडसुळ वांगेश्वर,तेल्हारा उकळी वांगेश्वर,वरूड वडनेर अशा चोहोबाजूंनी रस्ता व नदीवरील पुलाचा प्रश्न तसेच इतर सुख सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या असल्या तरी उर्वरित सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.