प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शेतीचे पंचनामे करा, खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्या महसूल विभागाला सूचना.
डोंगरगाव, कोळंबी, कळंबा, कसुरा, जोगलखेड, पारस येथील नुकसान ग्रस्त घर, शेतीची पाहणी.
प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शेतीचे पंचनामे करा, खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्या महसूल विभागाला सूचना.
डोंगरगाव, कोळंबी, कळंबा, कसुरा, जोगलखेड, पारस येथील नुकसान ग्रस्त घर, शेतीची पाहणी.

बाळापूर तालुक्यातील पारस येथे नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं खरीपचे पीक उध्वस्त होण्यासोबत काही घरात पावसाचं पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते या नुकसान ग्रस्त भागाची खासदार अनुप धोत्रे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत तालुका अध्यक्ष किशोर कुचके, नितीन लांडे,अमोल साबळे, रामदास लांडे, दिलीप पटोकार, माजी आमदार बळीराम सिरस्कार, शेलारमामा, अजिक्य राऊत,ऋषी ताठोड, मंगेश भरणे,योगेश पटोकार, विनायक वैराळे,बोरगाव वराळे उपसरपंच राजेश्वर वैराळे,पुरुषोत्तम शेळके, विपुल घोगरे, अर्चना मसने, मुक्तार खान, युवराज दांदले, सुनील गावन्डे, शाम पोहरे,धनंजय नेमाडे, आनंदराव नेमाडे, विनायक काटे, विठ्ठल दही, साहेबराव लांडे, गटविकास अधीकारी नाना पजई, नायब तहसीलदार भागवत यांच्या सह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पाहणी दरम्यान डोंगरगाव, कालबी, कलंबा, कसुरा, जोगलखेड, पारस येथील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या भावना ऐकूण घेऊन अधिकारी वर्गाला एक ही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी त्याच्या शेतीचे आणि घराचे पचनामे करावे अशा सूचना यावेळी दिल्या गेल्या आहेत.
