शिक्षण क्षेत्रातील भगीरथ सेठ बंसीधर झुनझुनवाला यांची प्रतिमा २९ जुलै रोजी होणार अनावरण.
सेठ बन्सीधर हायस्कूल शताब्दी वर्षातील 9 वे पुष्प.
शिक्षण क्षेत्रातील भगीरथ सेठ बंसीधर झुनझुनवाला यांची प्रतिमा २९ जुलै रोजी होणार अनावरण.
सेठ बन्सीधर हायस्कूल शताब्दी वर्षातील 9 वे पुष्प.

तेल्हारा येथील सुप्रसिद्ध सेठ बंसीधर झुनझुनवाला दहिगावकर एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला स्थापनेची १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेची स्थापना इ.स. १९२५ मध्ये करण्यात आली होती. या ऐतिहासिक शतकपूर्ती वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
समाजसेवा, सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व गुणवत्तापूर्ण शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारलेली ही संस्था आज शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरली आहे.
या शताब्दी वर्षातील नववे पुष्प म्हणून येत्या मंगळवार, २९ जुलै रोजी संस्थेचे मूळ प्रेरणास्थान सेठ बंसीधरजी झुनझुनवाला यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची प्रतिमा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


हा सोहळा संस्थेच्या शतकपूर्तीचा एक ऐतिहासिक व स्मरणीय क्षण ठरणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी माहिती दिली की, “ज्यांच्या नावावर संस्था उभी आहे, त्या सेठ बंसीधरजी यांच्या प्रतिमेचे अनावरण हे केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, त्यांच्या कार्याची जाणीवपूर्वक आदरांजली आहे.”
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंगतराय तोदी (बिलासपूर) – स्व. बंसीधरजींचे नातू – हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून आ. प्रकाश भारसाकळे (अकोट विधानसभा), माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आणि शासकीय कंत्राटदार अमित अग्रवाल यांची उपस्थिती लाभणार आहे.

या पावन प्रसंगी संस्थेतील ५,००० विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले जाणार आहे. सध्या संपूर्ण संस्था परिसरात उत्साहाचे वातावरण असून कार्यक्रमाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.
हा सोहळा केवळ एका व्यक्तीची प्रतिमा अनावरण यापुरता मर्यादित नसून, तो शिक्षण संस्कृतीचा, संस्थेच्या इतिहासाचा आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा प्रसंग ठरणारआहे.