राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे स्मारक उभारण्यात यावे.
- श्री छत्रपती प्रतिष्ठान ची मागणी.
राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे स्मारक उभारण्यात यावे.
– श्री छत्रपती प्रतिष्ठान ची मागणी.

तेल्हारा दि. –
तेल्हारा शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात यावे व सोबत विविध मागणी सह आज श्री छत्रपती प्रतिष्ठान तेल्हारा यांच्या वतीने तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
तेल्हारा शहरातील एकमेव विरंगुळा केंद्र व बगीच्या म्हणून हे उद्यान तयार होत आहे ज्या महापुरुषांच्या नावाने हे उद्यान उभारण्यात आले आहे त्या महापुरुषांचे स्मारक या उद्यान मध्ये असणे आवश्यक आहे .
राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद आहे . नवीन पिढीला त्याच्या दिव्य तेजस्वी असा इतिहास जाण व्हावी या करिता तेल्हारा शहरातील निर्माण होत असलेले राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ उद्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात यावे त्याच बरोबर या उद्यान मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसवण्यात यावे.
तसेच या उद्यान मध्ये येणाऱ्या महिला ,लहान मुले ,जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराची सुद्धा नितांत आवश्यकता आहे . अश्या विविध मागणीचे निवेदन छत्रपती प्रतिष्ठान याच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे ते प्रशासन अधिकारी हिरालाल अग्रवाल यांनी स्विकारले यावेळी प्रा सचिन थाटे ,गजानन गायकवाड , प्रदीप उर्फ पप्पू सोनटक्के ,गौरव धुळे , स्वप्नील सुरे उपस्थित होते .