अकोल्यात होळीच्या पर्वावर रंगणार भव्य कीर्तन महोत्सव.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त देहू नंतर अकोल्यात आयोजन, जयत तयारी सुरू.
अकोल्यात होळीच्या पर्वावर रंगणार भव्य कीर्तन महोत्सव.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त देहू नंतर अकोल्यात आयोजन, जयत तयारी सुरू.


अकोला : स्थानिक गायत्री नगर, कौलखेड रोड, अकोला येथील गायत्री नगरच्या प्रांगणात मागील सात वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीज निमित्त अकोल्याचा आयकॉन समजल्या जाणारा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव याही वर्षी होळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच रविवार दिनांक 16 ते रविवार दिनांक 24 मार्च दरम्यान दररोज नऊ दिवस, आठ ते दहा या वेळात होळी न खेळता भक्तिमय वातावरणात रंगणार आहे. विशेष म्हणजे अकोल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर जवळच्या जिल्ह्यातूनही वारकरी माळकरी भाविक या महोत्सवाची आवर्जून उत्सुकतेने वाट बघत असून या सोहळ्यात संत तुकाराम महाराज बिज ,एकनाथ महाराजांची षष्ठी व तिथीनुसार शिवजयंती असा त्रिरत्न उत्सवाचा योग असतो.
यावेळी दररोज अखंड विना, सकाळी पाच ते सहा काकडा, महिलांसाठी सकाळी 11 ते 2 व दुपारी दोन ते चार गाथा पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची भव्य दिव्य हरिकीर्तने होणार आहेत.
दि. 16 मार्चला ह भ प सचिन महाराज पवार देहू,
दि. 17 मार्चला ह भ प शिवाजी महाराज मानकर आळंदी,
दि. 18 मार्चला नाना महाराज कदम नेकनूर जिल्हा बीड,
दि. 19 मार्चला ह भ प गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू,
दि. 20 मार्चला ह भ प कृष्णा महाराज चवरे पंढरपूर,
दि. २१ मार्चला ह भ प अशोक महाराज इलग शास्त्री शेवगाव अहिल्यानगर,
दि. 22 मार्चला ह भ प अनिल महाराज पाटील बार्शी,
दि. 23 मार्चला ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाघ वारी भैरवगड
व दिनांक 24 मार्चला सायंकाळी सहा ते सात या वेळा ह भ प तुकाराम महाराज सखारामपुरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे,
गायनाचार्य म्हणून ह भ प किशोर महाराज लढे, ह भ प गोरखनाथ गतीर, विठ्ठल महाराज भेंडे आळंदी तर मृदंगाचार्य म्हणून ह भ प विठ्ठल महाराज कावळे, ह भ प अमोल महाराज पेलमहाले, ह भ प ज्ञानेश्वर महाराज यादगिरे व टाळकरी मंडळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंडळ देगाव यांची साथ लाभणार आहे, तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत तुकाराम सेवा समिती गायत्री नगर कौलखेड यांनी केले आहे.