भारतीय वायुसेना अधिकारी वैभव खारोडे यांची विंग कमांडर पदी पदोन्नती.
भारतीय वायुसेना अधिकारी वैभव खारोडे यांची विंग कमांडर पदी पदोन्नती.
भारतीय वायुसेना अधिकारी वैभव खारोडे यांची विंग कमांडर पदी पदोन्नती.

तेल्हारा शहरातील रहिवासी असलेले भारतीय वायुसेनेचे अधिकारी वैभव प्रदीपराव खारोडे यांची भारतीय वायुसेनेमध्ये वरीष्ठ पदावर विंग कमांडरपदी पदोन्नती झाली आहे.
तेल्हारा शहरातील मुळ निवासी असलेले वैभव यांचे वडील प्रदिपराव खारोडे हे सुद्धा भारतीय सैन्यात सैनिक होते सेवानिवृत्ती नंतरच्या काळात सामाजिक कार्यात त्यांचे कुटुंब सर्वश्रुत आहे वैभव यांचे लहान बंधू विवेक खारोडे हे सदा अग्रेसर, उत्कृष्ट वकृत्व लाभलेले युवा व्यक्तीमत्व आहेत. वैभव यांच्या झालेल्या बढती चे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
वैभव खारोडे यांची २०१२ मध्ये भारतीय वायुसेने मध्ये पायलट पदी नियुक्ती झाली होती. त्यावेळी देशातून फक्त 23 जणांची निवड झाली होती आता ते विंग कमांडर पदावर कार्यरत आहेत.