Uncategorized

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण 22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत येथे. 

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण 22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत येथे. 

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण 22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत येथे. 

मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे.. येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी, रविवारी कर्जत येथील रॉयल गार्डनमध्ये सकाळी 11 वाजता हा सोहळा होत असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली.. 

ग्रामीण महाराष्ट्रात अनेक तालुका पत्रकार संघ उत्कृष्ट पत्रकारितेबरोबरच समाजासाठी देखील अनेक उपक्रम राबवत असतात.. त्यांच्या या कार्याचा राज्य पातळीवर सन्मान व्हावा, त्यांचं कौतूक व्हावं यासाठी प्रत्येक महसूल विभागातून एका तालुका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड केली जाते.. यावर्षी विशेष बाब म्हणून विदर्भातून दोन तालुका संघांना हा पुरस्कार दिला जात आहे.. तसेच मुंबई विभागातूनही एका पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे.. यापुर्वी पुरस्कार वितरण सोहळे नागपूर,पाटण, अक्कलकोट, गंगाखेड, नगर जिल्ह्यातील कर्जत, माहूर, सेलू, वडवणी, पालघर आदि ठिकाणी झाले आहेत.. यंदा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे.. परिषदेचे हे पुरस्कार राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात..

2025 च्या पुरस्कारांचे मानकरी

पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा परभणी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर झाला आहे..

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत..

नागपूर विभाग : बेला तालुका पत्रकार संघ जिल्हा नागपूर

नागपूर विभाग : चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि.

गडचिरोली

नाशिक विभाग : नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ जिल्हा नाशिक

कोंकण विभाग : पनवेल महानगर प्रेस क्लब जि. रायगड

पुणे विभाग : आंबेगाव तालुका पत्रकार संघ जि. पुणे

लातूर विभाग : किनवट तालुका पत्रकार संघ जि. नांदेड

संभाजीनगर विभाग : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ जि.बीड

अमरावती विभाग : संग्रामपूर तालुका पत्रकार संघ जि.बुलढाणा

कोल्हापूर विभा : पलूस तालुका मराठी पत्रकार संघ जि. सांगली.

मुंबई विभाग: उपनगर पत्रकार असोशिएशन,

पुरस्कार वितरण सोहळयास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मोहिते, दर्वेश पालकर आदिंनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!