निर्माणधीन शिवसृष्टी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दया, तेल्हारा पालिकेतील ५ नगरसेवकांची आ.भारसाकळे यांच्या कडे मागणी.

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या विकासासाठी शिवसृष्टी करिता १ कोटींचा निधी मंजूर झाला असून भूमिपूजन सुध्दा झाले आहे या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी तेल्हारा पालिकेतील विरोधी गटातील ५ नगरसेवकांनी आ.प्रकाश भारसाकळे यांच्या कडे शिवसृष्टीचे भूमिपूजन होताच निवेदन देऊन मागणी केली.
सदर उद्यानात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा असून, उद्यानाचे नाव आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणे अत्यंत आवश्यक आहे. अश्वारूढ पुतळ्यामुळे उद्यानाची ऐतिहासिक ओळख अधिक भव्य, प्रेरणादायी आणि आकर्षक बनेल. तसेच भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्राभिमानाची जाणीव अधिक दृढ होईल.
त्यामुळे आपण आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून अथवा महाराष्ट्र शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करून तेल्हारा शहरातील या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यास मान्यता व निधी मिळवून द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते राजेश रमेशराव खारोडे, न.प.सदस्य कैलास ठोकणे ,कान्होपात्रा फाटकर , पंचफुलाबाई कंवर ,रिनाताई आसरे यांनी केली आहे.