शिवाजी विद्यालय, तेल्हारा येथे १९९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा ३१ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात.
शिवाजी विद्यालय, तेल्हारा येथे १९९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा ३१ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात.
शिवाजी विद्यालय, तेल्हारा येथे १९९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा ३१ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात.

श्री शिवाजी विद्यालय, तेल्हारा येथील सन १९९५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३१ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षणाचा उलगडा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद बाळासाहेब मार्के हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक सुरेशदादा खोटरे,सुधीर बापू देशमुख शाळा समिती सदस्य उपस्थित होते.

विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक एस बी पिवाल सर, उद्धवराव विखे सर, शाळा तपासणी अधिकारी अतुल म्हैसने सर, गजानन भारसाकळे सर, दिलीप सांगुनवेढे सर, पी. एस. शित्रे सर, सेवकराम कराळे सर, दिवाकर वानखडे सर, डी. एस. शिञे सर, सुरेश तायडे सर, टाले सर, अन्वर शाह बाबू साहेब, सौ. सावरकर मॅडम, सौ. परणाटे मॅडम, सौ. वानखडे मॅडम, डॉ. गो. खे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले,मुख्याध्यापक शांतिकुमार सावरकर, भोवर सर, लोखंडे सर, तेजराव कडू, विजय दहे आणि मुकुंद कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष आमले यांनी केले, तर प्रभावी सुत्रसंचालन प्रा. सदानंद बाणेरकर यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सुधीर ढोले व सौ. वैशाली सित्रे यांनी मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. आभार प्रदर्शन डॉ. सतीश वाकोडे यांनी केले.
या स्नेह मिलन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी अन्सार पटेल, दीपक फोकमारे, सुरेंद्र भोंगळ, सुनील राठोड, अतुल कोरडे, प्रभाकर डोंगरे, विवेक म्हसाये, शैलेश पाचडे, राजू मोरे, सतीश दुतोंडे, देवानंद फोकमारे, अहमदभाई, माधुरी देशमुख, मंगला अहेरकर, वैशाली माळी यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमात जुन्या आठवणी, मैत्रीचे ऋणानुबंध आणि गुरुजनांविषयीचा आदर यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.