कला

शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र(राज्य)यांचे वतीने साहित्य सेवेसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय स्व.भाई प्रभाकरराव सावरकर साहित्य रत्न पुरस्कार जाहिर. अमरावती चे शिवा काळे , प्रा. प्रतिक पाथरे यांची निवड.

शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र(राज्य)यांचे वतीने साहित्य सेवेसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय स्व.भाई प्रभाकरराव सावरकर साहित्य रत्न पुरस्कार जाहिर. अमरावती चे शिवा काळे , प्रा. प्रतिक पाथरे यांची निवड.

शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र(राज्य)यांचे वतीने साहित्य सेवेसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय स्व.भाई प्रभाकरराव सावरकर साहित्य रत्न पुरस्कार जाहिर.
अमरावती चे शिवा काळे , प्रा. प्रतिक पाथरे यांची निवड.

अमरावती –
शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र(राज्य)यांचे वतीने साहित्य सेवेसाठी दिला जाणारा राज्यस्तरिय निसर्गवासी लोकनेते साहित्यिक संपादक भाई प्रभाकरराव सावरकर साहित्य रत्न पुरस्कारासाठी वह्राड प्रकाशन अमरावतीचे शिवा काळे प्रा.प्रतिक पाथरे यांची निवड राज्याध्यक्ष जयदिप सोनखासकर शिक्षक साहित्य संघ व कमल सावरकर अध्यक्ष भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती प्रतिष्ठान तेल्हारा यांनी संयुक्तपणे जाहिर केले आहे.
शिक्षक साहित्य संघाचे राज्यस्तरिय नववे साहित्य संमेलन श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती येथे डॅा गणेश चव्हाण यांचे अध्यक्षतेत होणार असून श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उद्घाटक तरॲड जे .व्ही .पाटील पुसदेकर स्वागताध्यक्ष असणार आहेत.
दि१०व ११ ला होवू घातलेल्या राज्यस्तरिय साहित्य संमेलनात सदर पुरस्कार शिवा काळे व प्रा.प्रतिक पाथरे यांना दिला जाईल.शिवा काळे हे शिवकालीन विदर्भाचे शस्त्रागाराचे संग्राहक असून ते दुर्गअभ्यासक व इतिहास लेखक आहेत.प्रा प्रतिक पाथरे यांचा लेखन व्यासंग असून दोघांनीही स्वराज्य सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेमार्फत गाविलगड इतिहास परिषद चिखलदराचे भव्य आयोजन करत लेखक इतिहास अभ्यासक यांना लेखनास प्रेरित करण्याचे काम केले असून वह्राड प्रकाशन संस्था अमरावती द्वारा त्यांनी अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित करत विदर्भात लेखन साहित्य चळवळीला चालना दिली असल्यामुळे शिवा काळे व प्रा.प्रतिक पाथरे यांना दिल्या जाणाय्रा पुरस्काराबद्दल आठव्या शिक्षक साहित्य संमेलनााचे आयोजक अरविंद गिर्हे संघर्ष सावरकर ,शिवराज जामोदे,चारूदत्त मेहरे, रविद्र वर्गे, सिद्धार्थ शामस्कर, सुनिता कोरडे, राजाभाऊ कोरडे, सुनिता गिर्हे ,सविता काकड, हेमलता चव्हाण, गजानन नेमाडे तेल्हारा यांनी स्वागत केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!