लोकसहभागातून हिवरखेड तळेगाव शेतरस्त्याचे कामास सुरुवात.
रमेश दुतोंडे व स्थानिक शेतकऱ्यांचा पुढाकार.
लोकसहभागातून हिवरखेड तळेगाव शेतरस्त्याचे कामास सुरुवात.
रमेश दुतोंडे व स्थानिक शेतकऱ्यांचा पुढाकार.

हिवरखेड येथील तळेगाव शेतरस्त्यावरील अ. राजिक अ. सलाम यांच्या शेतापासून ते बरकत अली यांच्या शेतापर्यंतच्या शेतस्त्याचे काम लोकसहभागातून 4 मे रोजी सुरु करण्यात आले.
हिवरखेड तळेगाव शेत शिवारातील शेतकऱ्यांना सोयीचा शेत रस्ता रमेश दुतोंडे यांच्याहस्ते जेसीबी मशीनचे पूजन करून व नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली. या शेतरस्त्यावर जवळपास चाळीस शेतकऱ्यांची शेती आहे. पण रस्ताच नसल्याने पावसाळ्यात या रस्त्याने जाणे, मालाची ने-आण करणे शेतकऱ्यांसाठी एक तारेवरची कसरतच होती. रस्ता नसल्याने बरेचदा माल शेतामध्येच खराब व्हायचा. हा रस्ता तयार करण्यासाठी या शेतकऱ्यांनी रमेश दुतोंडे यांना पुढाकार घेण्याचे म्हटले त्यानुसार जवळपास रस्ता करण्यासाठी दीड लाख खर्च असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले यावर रमेश दुतोंडे यांनी तात्काळ 55 हजार रुपये वर्गणी देऊन शेतकऱ्यांना 1 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्याचे सांगितले त्यांच्या या आवाहनाला शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद देऊन लगेच एक लाख रुपये गोळा केले. रमेश दुतोंडे यांच्या या सहकार्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांना धन्यवाद देत त्यांचा सत्कार केला. यावेळी बरकत अली, मोहम्मद तलाह, रमेश येऊल,मोहम्मद नदीम,अशोक येऊल, महादेव गावंडे,अशोक पोके, जयदेव पोके,वासुदेव पोके,ज्ञानेश्वर गावंडे, विठ्ठल गावंडे,ज्ञानेश्वर दामधर,महमूद खां, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.