कृतीम बुद्धीमत्तेमुळे जग माहितीच्या विस्फोटाच्याजवळ, आध्यात्मिक बुद्धीमत्तेमुळे प्रभावी नियंत्रण शक्य – डॉ. सोमनाथ वडनेरे.
ब्रह्माकुमारीज्तर्फे ज्ञानरोवर, आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलन.
कृतीम बुद्धीमत्तेमुळे जग माहितीच्या विस्फोटाच्याजवळ, आध्यात्मिक बुद्धीमत्तेमुळे प्रभावी नियंत्रण शक्य – डॉ. सोमनाथ वडनेरे.
ब्रह्माकुमारीज्तर्फे ज्ञानरोवर, आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलन.

कृतिम बुद्धीमत्ता, आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा विविध क्षेत्रातील वाढता वापर पहाता माहितीच्या गतीमान आदान प्रदानामुळे जग माहितीच्या विस्फोटाच्या जवळ पोहचला असून अनेक मनोसामाजिक प्रश्न यामुळे भविष्यात होत आहेत तथापि एआयच्या अविवेकी आणि अनियंत्रीत वापराला आध्यात्मिक बुद्धीमत्तेद्वारे प्रभावी नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.
`जागतिक शांती आणि सदभावनेचे अग्रदुत म्हणून माध्यमांची भूमिका` या विषयावर ब्रह्माकुमारीज्तर्फे ज्ञानरोवर, आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी ` सोशल मीडियात कृतिम बुद्धीमत्तेचा वापराचे फायदे आणि तोटे` या विषयावर मुख्य संबोधन केले. ते पुढे म्हणाले की, विविध क्षेत्रातील एआयच्या वापराबरोबर प्रत्येक सोशल मीडियाने देखील याचा वापर सुरु केला आहे. तथापि प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापरामागे मानवीय मूल्य आणि संवेदना असल्यास त्याचाकडून नुकसान होत नसते, सोशल मीडियामध्ये डिफेक व्हिडिओ, हनी ट्रॅप, आदिसारख्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून अनियंत्रीत आणि अविवेकी वापर त्यास कारणीभूत आहे. एआयला विवेकी आणि नियंत्रीत वापरासाठी आध्यात्मिक बुद्धीमत्ता महत्वाचे ठरते.
थिंक बिफोर क्लिक –
सोशल मीडियाचा वापर करतांना अतिशय काळजी घेणे गरजेचे असून एआयच्या माध्यमातून प्रलोभनास बळी पडण्यास केवळ एखादी एमेज डाऊनलोड करण्यासाठी एक क्लिक कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी विचारपूर्वक आणि सावधनतेने वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तीन दिवशीय संमेलनात देशभरातील अनेक माध्यमतज्ज्ञांनी यात सहभाग नोंदविला.
याप्रसंगी बी.के. निकुंज, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, मुंबई, बी.के. कोमल, संपादक, मधुबन न्यूज चैनल, आबू, कबीर झारीवाला, पोडकास्टर, दिल्ली, डॉ. एस. के. वर्मा, सहायक संचालक, दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण, जामीया मिलीया इस्लामीया विद्यापीठ, दिल्ली, डॉ. सुनिता, आबू, डॉ. नंदिनी द्विवेदी, अहमदाबाद यांनी समायोचित मनोगते व्यक्त केले.