आपला जिल्हा अकोलाधार्मिक

शिवजयंती पर्वावर तेल्हारा शहरात रक्तदान शिबीर. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा पुढाकार. 

शिवजयंती पर्वावर तेल्हारा शहरात रक्तदान शिबीर. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा पुढाकार. 

शिवजयंती पर्वावर तेल्हारा शहरात रक्तदान शिबीर. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा पुढाकार.

तेल्हारा – शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवजयंती पर्वावर 18 फेब्रुवारी ला रक्तदान शिबीर घेण्यात आले या मध्ये 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तेल्हारा शहर व तालुका च्या पुढाकाराने गत सात वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो या दरम्यान पहिल्या दिवशी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. या वर्षी सुद्धा दि. 18 फेब्रुवारी ला रक्तदान शिबीर आयोजित केले गेले या मध्ये शिवप्रेमी नी हिरिरीने सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीर मध्ये 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अकोला येथील रक्तपेढी च्या चमुनी यावेळी सहकार्य केले. तेल्हारा शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती च्या युवकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

 दरवर्षी प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने 19 फेब्रुवारी ला शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात राजेशाही थाटात साजरा केला जातो तीच परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली जाणार असल्याचे सांगितले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!