जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा ने केला 67 गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार.
सकल कुणबी समाजातील दहावी, बारावी, जेईई, निट, सीईटी व स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी चा गुणगौरव सोहळा.
जगद्गुरू प्रबोधन मंडळ तेल्हारा ने केला 67 गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार.
सकल कुणबी समाजातील दहावी, बारावी, जेईई, निट, सीईटी व स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी चा गुणगौरव सोहळा.

जगद्गुरू प्रबोधन मंडळातर्फे सकल कुणबी समाजातील दहावी, बारावी, जेईई, निट, सीईटी व स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवलेल्या 67 गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
श्री साई मंगल कार्यालय तेल्हारा येथे उत्साहात संपन्न झालेल्या या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश वाकोडे होते तर उदघाटक म्हणून डॉ. बाबुराव शेळके होते तर उल्हासराव पठाडे, रमेश दुतोंडे, मनोहर खोटरे,गटशिक्षणाधिकारी सौ. सुनिता तळोकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करतांना सौ. निलीमा घुंगड यांनी विध्यार्थ्यानी अभ्यासाबरोबरच स्वतःच्या चारित्र्याकडे लक्ष द्यावे विशेषतः मुलींनी फॅशनच्या आहारी न जाता स्वतःच्या शील आणि संस्कृतिकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले तर प्रा. सदाशिव शेळके यांनी समाजकारणा बरोबरच राजकारणाकडे सुद्धा समाजाने जागृततेने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
दरम्यान गुणवंत विद्यार्थी बरोबरच कुणबी समाज संघटना तेल्हाऱ्याचे आजी माजी पदाधिकारी ज्ञानेश्वर बहाकर, विठ्ठल मामनकार, संदिप खारोडे, रामेश्वर हागे, डॉ. प्रतिभा वाकोडे, साधना माहोकार यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले तसेच महाराष्ट्र समाज भूषण पुरस्काराने सन्मानाने सन्मानित विशाल नांदोकार, मुंबई महानगर पालिकेत कार्यकारी सहायक पदी नियुक्ती झाल्याबाबत पुजा नांदोकार,डॉ. अंकुश कराळे, संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ अकोलाचे अध्यक्ष सुभाष दातकर, उत्कृष्ठ शेतकरी श्रीकृष्ण ठोंबरे व प्रसिद्ध हवामान तज्ञ अमोल दुतोंडे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगद्गुरू प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कराळे यांनी, सूत्रसंचालन धनश्री टिकार यांनी तर आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगद्गुरू प्रबोधन मंडळाचे महेंद्र कराळे,राजेश बुरघाटे सह जगदगुरु प्रबोधन मंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.