आपला जिल्हा अकोलामहाराष्ट्र

बेलखेड च्या प्रशांत तायडे ची पुणे-बेलखेड सायकल मोहीम. 520 किमी चा प्रवास तिन दिवसात.

बेलखेड च्या प्रशांत तायडे ची पुणे-बेलखेड सायकल मोहीम. 520 किमी चा प्रवास तिन दिवसात.

बेलखेड च्या प्रशांत तायडे ची पुणे-बेलखेड सायकल मोहीम.

520 किमी चा प्रवास तिन दिवसात.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील युवक नोकरी निमित्त पुणे येथे राहत असल्याने आपले जन्मगावी जन्मदिन- प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पुणे ते शेगांव,बेलखेड ५२० कि. मी. सायकल प्रवास ३ दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण करून युवकांना फिट इंडिया व आरोग्यदायी जीवनशैली अवलंबविण्याचा संदेश देण्याच्या प्रेरणादायी उद्देशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

पुणे ते शेगांव, बेलखेड या मोहिमे दरम्यान प्रशांत रामरतन तायडे सोबत इंडो अ‍ॅथलेटिक सोसायटीचे ६ सायकल पटू मित्र सोबतीला होते. यामध्ये गिरीराज उमरीकर, अजीत पाटील, श्रीकांत चौधरी, प्रशांत तयाडे, सुशील मोरे आणि प्रतीक पवार यांचा समावेश होता. सदर मित्रां सोबत पुणे ते शेगाव ४८० कि.मी. प्रवास व नंतर शेगांव ते जन्मगाव बेलखेड पर्यंत एकट्याने प्रवास केला.

सायकल मोहीम शनिवार, २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजता जुना मुंबई–पुणे महामार्गावरील नाशिक फाटा येथून अध्यक्ष इंडो अ‍ॅथलेटिक सोसायटीचे गजानन खैरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थापक सदस्य गणेश भुजबळ, रमेश माने, संतोष नखाते, प्रदीप टेक, श्रीकांत बोर्से, कैलाससेठ टपकीर आणि श्रेयस पाटील यांनी उपस्थित राहून सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या.

पहिल्या दिवशी सुमारे २२० कि.मी. अंतर पार करत पुणे – वाघोली – अहिल्यानगर – देवगड असा प्रवास करण्यात आला. यावेळी देवगड येथे भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यात आले तिथुन २० किमि पुढे मुक्काम केला. 

दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता येथून प्रवास सुरू झाला. छत्रपती संभाजीनगर – पुढे जालना मार्गे सायकलपटू देऊळगाव राजा येथे ४ वाजता पोहोचले. जवळच राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यात आली. संध्याकाळी श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन रात्रीचा मुक्काम देऊळगाव राजा येथे करण्यात आला.

तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता प्रवास सुरू झाला. चिखली व खामगाव मार्गे शेगावकडे जाताना शेगाव येथे सायंकाळी ४ वाजता शेगाव येथे पोहोचून सहा मित्रांनी ही ४८० कि.मी. सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आणि प्रशांत ने गावाकडे जात ५२० कि. मी. अंतर करुन आपल्या बेलखेड येथील घरी पोहचून पुर्ण केली. 

ही सायकल मोहीम प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली असून, ‘फिट इंडिया’चा संदेश देणे व तरुण पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रेरित करणे हा तिचा मुख्य उद्देश होता.

यापुर्वी प्रशांत ने पुणे – कन्याकुमारी, पुणे – अयोध्या, पुणे – सोमनाथ अशा सायकल मोहिमे यशस्वी पणे केल्या त्या दरम्यान पुणे – शेगाव – बेलखेड ला जाण्याचा निच्छय केला होता आणि हि मोहिम वडील रामरतन तायडे यांच्या आठवणीत समर्पित केली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!