शेतकरी-शेतमजूरांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची तेल्हारा येथे बैठक संपन्न.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार अपयशी - प्रशांत डिक्कर.
शेतकरी-शेतमजूरांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची तेल्हारा येथे बैठक संपन्न.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार अपयशी – प्रशांत डिक्कर.

शेतकरी आणि शेतमजूरांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी तहसील रोड श्रीकृष्ण मंदिर तेल्हारा येथे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या जसे की कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान आणि त्याची मदत, पीक विमा योजना, शेतकरी रस्त्यांची दुरुस्ती, जंगलातील जनावरांमुळे होणारे पिकांचे नुकसान भरपाई, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.


प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर तीव्र टीका करताना सांगितले की, “विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवेल असा इशारा डिक्कर यांनी यावेळी दिला. बैठकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची गाव तिथे शाखा, घर तिथे संभाजीराजे” या विचाराला तळागळात पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.उपस्थित असलेल्या शेकडो युवकांनी पुढे येत छत्रपती संभाजीराजे सोबत पक्षाचे काम करण्याचा संकल्प केला. तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्या बाबत लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी-शेतमजूरांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन केले.

यावेळी शेतकरी पॅनेलचे राजेश रमेशराव पाटील खारोडे, जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, यांचे शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आशिष शेळके, रोहित ताथोड, कुलदीप बाजारे,नितीन वाकोडे,शुभम ईसापुरे,वैभव खाडे,अनिल तायडे, चंद्रकांत मोरे, राहुल सावरकर,प्रज्वल बुरघाटे, सुधाकर हागे, ज्ञानेश्वर गोतमारे,वैभव पोटे,शाम गावंडे,माणीक खिरसान.विजय नेरकर, शुभम चिंचोलकर,माजी सरपंच अनंता अरबट यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते. बैठकिचे सुत्र संचालन धनु गावंडे यांनी केले.