आपला जिल्हा

“ऑनलाईन सुरक्षेचा धडा : अकोल्यात विद्यार्थ्यांना सायबर शिका–सायबर सुरक्षा मार्गदर्शन.

सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढून "सायबर साक्षरता हाच सायबर संरक्षणाचा मार्ग" हा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचला.

“ऑनलाईन सुरक्षेचा धडा : अकोल्यात विद्यार्थ्यांना सायबर शिका–सायबर सुरक्षा मार्गदर्शन.
सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढून “सायबर साक्षरता हाच सायबर संरक्षणाचा मार्ग” हा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचला.

अकोला : डाबकी रोडवरील सरस्वती खंडेलवाल स्कूल येथे “सायबर शिका – सायबर सुरक्षा” या विषयावर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील सायबर वॉरियर कु. दर्शना प्रकाश वाघेला व कु. गायत्री चंद्रकांत मोडके यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर मॅडम होत्या तर शाळेचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने या सत्राचे आयोजन करण्यात आले.
सत्रामध्ये मोबाईलचा संयमी वापर, मोबाईल फसवणुकीचे प्रकार, ऑनलाईन फसवणूक, विविध प्रकारचे सायबर हल्ले याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच Instagram, Facebook, Snapchat यांसारख्या सोशल मीडियावर वाढणाऱ्या फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. याशिवाय तरुण पिढीला भुरळ घालणाऱ्या गेमिंग फसवणुकीविषयी देखील महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढून “सायबर साक्षरता हाच सायबर संरक्षणाचा मार्ग” हा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचला.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!