आपला जिल्हानैसर्गिक

तेल्हारा तालुक्यातील काही गावात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर, नदी काठावरील घरे व शेत पिकांचे मोठे नुकसान. काही ठिकाणी घर, वृक्ष पडली.

तेल्हारा तालुक्यातील काही गावात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर, नदी काठावरील घरे व शेत पिकांचे मोठे नुकसान. काही ठिकाणी घर, वृक्ष पडली.

तेल्हारा तालुक्यातील काही गावात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस.
नदी नाल्यांना पूर, नदी काठावरील घरे व शेत पिकांचे मोठे नुकसान. काही ठिकाणी घर, वृक्ष पडली.

तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे, तळेगाव वडनेर,खापरखेड ,भांबेरी,मनब्दा,पंचगव्हाण, पिंवदळ,तुदगाव,निभोरा,सांगवी सह काही गावामध्ये शनिवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस आला त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊन नदी काठावरील घर व शेत शिवार तसेच गावांत पाणी जावून पूराचा फटका बसला आहे.

तालुक्यात शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने काही गावात मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार ढगफुटी सारख्या वादळीवारा पावसाने गावात वृक्ष व घरे पडून नुकसान झाले. तसेच नदी नाल्यांना आलेल्या पूराने नदी काठावरील घरे व शेत पिकांचे मोठे नुकसान झाले.

जोराचा वारा पाऊस व विजांचा कडकडाटा मुळे तालुक्यात काही भागात तिन चार तास विद्युतप्रवाह खंडीत होता. विज वितरण च्या अधिकारी कर्मचारी यांनी वेळीच दखल घेऊन विज पुरवठा सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे खापरखेड सह काही भागांत वृक्ष कोलमडली. त्यात काही घरांची पडझड झाली अनेकांच्या घरांवरील टिन पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. तसेच काही गावात नदी चा प्रवाहाचे पाणी लोंढा आल्याने सुद्धा नुकसान झाले आहे तसेच दहिगाव अवताडे, तळेगाव वडनेर,पंचगव्हाण, पिंवदळ निंभोरा, तुदगाव या परिसरात शेत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. या झालेल्या नुकसान ची पाहणी करून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!