आपला जिल्हाधार्मिक

विश्वबंधुत्वाची प्रार्थना ज्ञानेशांचे पसायदान – श्री ज्ञानेश्‍वरदासानुदासभागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

विश्वबंधुत्वाची प्रार्थना ज्ञानेशांचे पसायदान - श्री ज्ञानेश्‍वरदासानुदासभागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

विश्वबंधुत्वाची प्रार्थना ज्ञानेशांचे पसायदान – श्री ज्ञानेश्‍वरदासानुदासभागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

स्वामिनीष्टेपोटी कर्तव्य तत्पर राहून महिन्या अखेर सेवा करून जे मिळत असते ते वेतन , पगारा व्यतिरिक्त टेबलाखालून जी घेतल्या जाते तिला लाच असुन,ज्या सेवेचे मूल्यांकन पैशात करीता येणे शक्य नाही परंतु अंशतः का होईना त्यातून उत्तीर्ण होण्याकरिता जे सप्रेम सन्मानपूर्वक दिल्या जाते ते मानधन होय . कुठल्याही प्रकारची सेवा न करता धाकदडपशाहीने मिळविल्या जाते तीला खंडणी असे म्हणतात , मधुकर म्हणजे भृंगा ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फुल झाडांवरून मधु म्हणजे सहद गोळा करीत असतो . त्याप्रमाणे विद्यार्थीदशेत विद्यार्जन करीत असतांना साधना काळातील अपरिग्रही अवस्थेत स्वतःच्या उदरनिर्वाहाचे कुठलेही नियत साधन उपलब्ध नसल्यामुळे पाच घरी फिरून कर म्हणजे हातावर मागितल्या जाते ती मधुकरी होय. स्वतःचे पोट भरावे याकरिता निराधार निराश्रीत भिक्षुक मागत असतात ते भिक्षा , संपूर्ण कुटुंबाच्या साठी कुठलेही काबाडकष्ट न करता झोळी घेऊन घरोघरी व गावोगावी फिरून मागितल्या जाते तीला भीक असे म्हणतात. समाजातील प्रतिष्ठित असणाऱ्या पंचांनी एकत्रित येऊन सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून समाज कल्याणाकरिता स्वेच्छेने जो जे देईल ते गोळा केल्या जाते ते दान तर , सेवा स्वतः करून त्याचे फळ मात्र विश्वाच्या कल्याणासाठी मठात्मक , राऊळात्मक , देवळात्मक , मंदिरात्मक नव्हे तर, विश्वात्मक असणाऱ्या श्रीगुरूंकडे विश्वाचा आकृतीबंध सत्यं शिवं सुंदरम् बनवून , विश्वशांती करिता त्यांना प्रसन्न करून प्रार्थनापूर्वक अखिल विश्वातील मानव मात्रा करिताच नव्हे तर,त्र्यलोक्यातील संपूर्ण भूतमात्रांना डोळ्यासमोर ठेवून जे मागितल्या जाते त्याला पसायदान असे म्हणतात.
किंबहुना समाजातील सर्वश्रेष्ठांनी आपल्या ज्येष्ठांकडे जनसामान्य सर्वांना सर्वश्रेष्ठत्व प्राप्त व्हावे याकरिता सलगिने केलेली विश्वशांतीची सात्विक प्रार्थना, अखंड दान करणाऱ्या विराट शक्तीला काय मागावे याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे पसायदान होय. पसायदान हे ज्ञानेश्वरीरूपी दुधाच्या सागरावर आलेली साय अर्थातच सार आहे. आज रोजी उपलब्ध असणाऱ्या ९०३३ ओव्या रुपी फुलातून काढलेले उच्च प्रतीचे अत्तर आहे. ते माऊलीचे हृद्गत नव्हे तर , विश्वाच्या कल्याणाकरिता त्यांच्या देहा बाहेरील प्रत्यक्ष धडधडणारे दुसरे हृदयच आहे. यातील नऊ ओव्या ह्या ईशादि नौ उपनिषदांचे सारं स्वरुप असून , सूत्ररूप ज्ञानेश्वरीच आहेत. किंबहुना आधुनिक विज्ञानाच्या परीभाषेत सांगायचे झाल्यास पसायदान हे ज्ञानेश्वरीची पीपीटी फाईल आहे. पसायदान हे ज्ञानेश्वरी रुपी मंदिराचा झळझळीत सुवर्ण कळस असुन, पंढरी क्षेत्री यात्रा कालखंडात भगवान पांडुरंगाचे दर्शन जर झाले नाही तर , केवळ कलश दर्शनावरच वारकरी समाधान मानतात . कारण कलश दर्शन हेच मोक्षप्राप्तीचे व अहंकार निवृत्ती चे सुलभ साधन आहे. तद्वत ज्यांना प्रत्यक्ष संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण करणे शक्य नसेल त्यांना पसायदान रुपी कळसाचे दर्शन झाले की त्यांच्या जीवनात आपोआपच आत्मकल्याणाची प्रभा पसरल्याशिवाय राहत नाही.
म्हणून पसायदान हे कुठल्याही धर्म विशेषाची नव्हे तर , विश्वबंधुत्वाची प्रार्थना असल्यामुळे ते दररोज गाऊन भगवान श्री ज्ञानोबारायांच्या कल्पनेतील उन्नत विश्वाचे रेखाचित्र ( ब्ल्यू प्रिंट ) वास्तवात उतरविण्याचा प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

श्री ज्ञानेश्‍वरदासानुदास
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!