महागिरी येथील मागेरी ‘महादेव’ भाविकांचे श्रद्धास्थान. सातपुडा पर्वतामधील गुफेमध्ये पुरातन शिवमंदिर;तिसऱ्या सोमवारी वारी हनुमान मंदिराचे महंत कृष्णानंदजी भारती महाराज यांचा भव्य भंडारा,शिवभक्तांची गर्दी.
महागिरी येथील मागेरी 'महादेव' भाविकांचे श्रद्धास्थान. सातपुडा पर्वतामधील गुफेमध्ये पुरातन शिवमंदिर;तिसऱ्या सोमवारी वारी हनुमान मंदिराचे महंत कृष्णानंदजी भारती महाराज यांचा भव्य भंडारा,शिवभक्तांची गर्दी.
महागिरी येथील मागेरी ‘महादेव’ भाविकांचे श्रद्धास्थान.
सातपुडा पर्वतामधील गुफेमध्ये पुरातन शिवमंदिर;तिसऱ्या सोमवारी वारी हनुमान मंदिराचे महंत कृष्णानंदजी भारती महाराज यांचा भव्य भंडारा,शिवभक्तांची गर्दी.

सातपुड्याच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात पुरातन महागिरी गुफेत वसलेले ‘महादेव’ शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून, श्रावणातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी शेकडो शिवभक्त दर्शनासाठी येतात.

कोमद नदीच्या तीरावर सातपुडा पर्वतामधील गुफेत पुरातन शिव मंदिर आहे. हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी महागिरी महादेवाची स्थापना केल्याचे बोलले जाते. ही गुफा शिवकालीन आकाराची आहे. दोन किमी उंच असून, या उंच गुफेला नदीने चुहबाजूनी वेढा दिला आहे. या निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची, शिवभक्तांची मने प्रसन्न होऊन जातात.

पूर्वीपासूनच शिवभक्त पाठिकाणी दर्शनासाठी येतात. ही परंपरा कायम राहावी म्हणून वारी हनुमान मंदिराचे महंत कृष्णानंदजी भारती महाराज हे दरवषी याठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन करत असतात. आज महागिरी महादेवाला मागेरी महादेव म्हणून सुद्धा ओळखले जाते. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील संत सोनाजी महाराज याठिकाणी दर्शनासाठी येत असल्याची आख्यायिका आहे. ते ज्या दगडावर विश्राम करत तो दगड आजही अस्थित्वात असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या दगडावर कितीही लोकांनी विश्राम केला तरी एका व्यक्तीची जागा शिल्लक राहते, असे सांगितले जाते. पर्वतावर शिवभक्तांना पाणी पिण्यासाठी पुरातन विहिर आहे.

मंदिर स्थळी जाण्यासाठी मार्ग –
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महादेव महागिरी येथे जाण्यासाठी सोनाळा येथून गुमठी, पिंगळी, सेभा, मार्गे पहाडात १४ किमी अंतरावर आहे. मोटासायकलने फॉरिस्ट कॅम्पपर्यंत जाता येते.
महागिरी महादेवाच्या दर्शनासाठी दूरवरून शिवभक्त या ठिकाणी दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी वारी हनुमान मंदिराचे महंत कृष्णानंदजी भारती महाराज हे श्रवणातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी महाप्रसादाचे भव्य आयोजन करीत असतात. यामधे दानापूर, वारखेड, सोगोडा, हिवरखेड, सोनाळा, टूनकी येथील शिवभक्तांचे सहकार्य लाभत असते.

वन विभागाचा तगडा बंदोबस्त –
महागिरी महादेव हे ठिकाण सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असल्याने शासनाने हा जंगलभाग आता व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे महागिरी महादेव या ठिकाणी जात असताना वन विभागाने त्यांचा तगडा बंदोवस्त वाढवला आहे.
पर्वतावर भली मोठी गुफा –
महागिरी महादेव हे पर्वतावर असलेल्या गुफेत विराजमान आहेत. ही गुफा २० बाय २० च्या आकाराची असून, या गुफेत पाणी भरलेले असते. त्यातून वाट काढत शिवभक्तांना महादेवाचे दर्शन घ्यावे लागते. या महादेव पिंडीवर सतत पाण्याची धार पडत असते. यावेळी शिवभक्त आपली इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करून पूजाअर्चा करताना दिसतात.