“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम” अमरावती विभागातून उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम) या गटातून धनंजय बरडे उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम), उपविभाग, तेल्हारा कार्यालय द्वितीय क्रमांक.
15 ऑगस्ट ला पालकमंत्री अकोला आकाश फुंडकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत केला गौरव.

“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम”, ही राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरांवरील एकूण १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये अमरावती विभागातून उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम) या गटातून उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम), उपविभाग, तेल्हारा हे कार्यालय द्वितीय क्रमांकाने निवडण्यात आले आहे. कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देवून चमूचे मनःपूर्वक अभिनंदन करून गौरवण्यात आले आहे.

जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री आकाश फुंडकर,आमदार रणधीर सावरकर, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार,जिल्हा पोलीस अधीक्षक सह मान्यवरांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम” अंतर्गत तालुका स्तरांवर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धनंजय बरडे उप अभियंता यांना हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रशस्तीपत्र हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,अजित पवार उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीचे आहे.