भाजप आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर चा निषेध.
तेल्हारा काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने.
भाजप आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर चा निषेध.
तेल्हारा काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने.

माजी मंत्री भाजप आमदार बबन लोणीकर याने एका संविधानीक पदावर असतांना शेतकऱ्यांच्या विषयी एका आयोजित कार्यक्रमात बोलतांना आक्षेपार्ह विधान केले त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या भावना दुखल्या बद्दल आज दि 28 जुन 2025 रोजी तेल्हारा येथे तेल्हारा काँग्रेस कमिटी च्या वतीने आ.लोणीकर याच्या विरोधात टॉवर चौकात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
भाजपाचे नेते नेहमीच शेतकरी विरोधी विधाने करतात व मुख्यमंत्री व नेते त्याला खत पाणी घालतात त्याचा सुद्धा घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड महेश सुधाकरराव गणगणे, ज्येष्ठ नेते अशोकराव बिहाडे, ॲड एस आर राहणे, ओम पाडीया, तालुका अध्यक्ष गजानन वानखडे, शहराध्यक्ष ॲड संदीप देशमुख, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश वाकोडे, प्रशांत देशमुख, माजी सभापती अतुल ढोले, माजी शहराध्यक्ष सोनू मालिये, ॲड पवन शर्मा, अनंतराव सोनमाळे, अन्सार पटेल, मुरलीधर तिंवर, उमेश पांडे, श्याम बघ्घन, उपसरपंच विजय जायले, फिरोज खा पठाण, आशुतोष बलोदे, ॲड नासीर, शेखर भुजबले, शेख अक्रम, दीपक झाडोकार, पुरुषोत्तम मानकर, नितीन पिंपळकर , निजाम शाह, शेख सलमान, शुभम सोनोने सह काँग्रेस नेते कार्यकर्ते उपस्थित होते.