वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक दानापूर शाळा प्रवेशोत्सव.
पूजन आणि खाऊ वाटपाने विद्यार्थिनींनी अनुभवला शाळेचा आनंद.
वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक दानापूर शाळा प्रवेशोत्सव.पूजन आणि खाऊ वाटपाने विद्यार्थिनींनी अनुभवला शाळेचा आनंद.

उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भातील शाळा 23 जून रोजी सुरू झाल्या असून, जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक कन्या शाळा, दानापूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
नवीन प्रवेश घेतलेल्या आणि वर्गोन्नत झालेल्या विद्यार्थिनींना फुलांनी सजविलेल्या पारंपरिक बैलगाडीत बसवून, बँड-बाजाच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेत दाखल झाल्यावर राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत वैतकार, उपाध्यक्ष धम्मपाल वाकोडे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल, गीताताई घायल, अकिल भाई, विक्रमभाऊ नांदुरकर, रवींद्र दांदळे, भीमराव कांबळे, प्रेस क्लब अध्यक्ष भगवान हागे, उपाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे, मुख्याध्यापिका नयना कळंबे, शिक्षिका ठोंबरे मॅडम, नवलकर मॅडम, डिवरे मॅडम, शिक्षक सुताडे सर, वानखडे सर, सचिन ठोंबरे सर यांची उपस्थिती होती.

विद्यार्थिनींनी “आई, मी शाळेत जाणार; शिकून घराला पुढे नेणार!” असा ठाम निर्धार व्यक्त करत शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटला. या दिवशी सर्व विद्यार्थिनींना गणवेश, शूज, सॉक्स आणि नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थिनींना शिरा व खिचडीचा गोड खाऊ देण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, आणि पोषण आहार कर्मचारी सचिन कांडेलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सचिन ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका संगीता ठोंबरे यांनी केले.