आपला जिल्हा

जिल्ह्यात 9 लक्ष 72 हजार शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण.

‘मेरा केवायसी’द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन.

जिल्ह्यात 9 लक्ष 72 हजार शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण.
‘मेरा केवायसी’द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन.

अकोला, दि. 21 : अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी व त्यांचे आधार क्रमांक या आधारे शिधापत्रिकेत नमुद व्यक्तींची खातरजमा ई- केवायसीद्वारे होते. जिल्ह्यातील 9 लक्ष 72 हजार 338 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून अद्यापही 3 लक्ष 26 हजार 458 व्यक्तींनी ती पूर्ण केली नाही. आता ‘मेरा केवायसी’ हे ॲपही उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रक्रिया सोपी-सुलभ झाली आहे. त्यामुळे संबंधितांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले आहे.

जिल्ह्यात एकूण 12 लक्ष 98 हजार लाभार्थी आहेत. ई-केवायसीसाठी शासनाने दि. 31 मे पर्यंत मुदत दिली असून ती पूर्ण करणे बंधणकारक आहे. गरजूंना धान्याचा लाभ सुरळीत सुरू राहावा यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारक प्रत्येक लाभार्थ्याची ई-केवायसी बंधनकारक केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांमध्ये जाऊन ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात यावी, लाभार्थ्यांना घरबसल्या आता ई- केवायसी करता येणार आहे. लाभार्थी दुकानात न जाता स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करू शकतील. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्राच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

ही प्रणाली राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत ज्या लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांमध्ये जाऊन ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी ॲपचा वापर करावा, असे आवाहन श्री. यन्नावार यांनी केले.

अकोला ग्रामीणमध्ये 37 हजार 876, अकोला शहरात 66 हजार 30, अकोट शहरात 36 हजार 798, बाळापूर शहरात 48 हजार 321,बार्शिटाकळी शहरात 38 हजार 191, मुर्तिजापूर शहरात 36 हजार 74, पातूर शहरात 30 हजार 404, तेल्हारा 32 हजार 773 अशा एकूण 3 लक्ष 26 हजार 458 व्यक्तींची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. ती तात्काळ करून घेण्याचे आवाहन श्री. यन्नावार यांनी केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!