Uncategorized

श्री सोमेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री पर्व उत्साहात.

काशीत बसे विश्वेश्वर,तळेगावात वसे सोमेश्वर.

श्री सोमेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री पर्व उत्साहात.
तेल्हारा – दि.

काशीत बसे विश्वेश्वर,तळेगावात वसे सोमेश्वर.
पश्चिम वाहिनी पिंड.
या म्हणीप्रमाणे तळेगांव बाजार येथे पश्चिम वाहिनी, शिवलिंग असलेले प्रसिद्ध श्री.सोमेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती असते. तळेगांव बाजार येथील महाशिवरात्री उत्सव पुरातन काळापासून तीन दिवसाचा असतो.

पहिला दिवस महाशिवरात्री निमित शिवपुजन, दुसऱ्या दिवशी श्री. सोमेश्वराला केलेले नवस म्हणजे लहान मुलांचे लोटांगण आणि दुपारी रथ यात्रा प्रारंभ त्यानंतर तिसऱ्या दिवशी महाप्रसादाने सांगता असे उत्सवाचे स्वरूप असते.


या वर्षी दि. 26/02/2025 महाशिवरात्री निमित्त श्री.सोमेश्वर मंदिरात महापूजा होऊन दर्शनासाठी पंचक्रोशीतील उपस्थित भाविक भक्तांना गावाकऱ्यांच्या वतीने साबुदाणा उसळीचे वाटप करण्यात येईल. 27 फेब्रुवारी ला सकाळी लहान मुलांचे लोटांगण आणि दुपारी संस्थान परिसरातून श्रींच्या रथ मिरवणुकीला प्रारंभ होऊन अर्ध्या गावातुन प्रदक्षिणा करून पूर्वीपासून निश्चित केलेल्या जागी रथ मिरवणुक विसावा घेते.
28 फेब्रुवारी ला यात्रेचे आयोजन करून दुपारी उर्वरित रथ मिरवणुकीस प्रारंभ होऊन याच दिवशी संध्याकाळी संस्थानच्या आवारात महाप्रसादाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता होईल.

महाशिवरात्री उत्सवा निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयी करीता 26फेब्रुवारीला गावातील ऑटो चालक आणि इतर वाहन धारकांकडून मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली असून हिवरखेड,गोर्धा फाटा आडगाव बुद्रुक, खंडाळा फाटा येथून मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.
28 फेब्रुवारीला दहीहंडीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून महाशिवरात्री पर्वा निमित्त श्री.सोमेश्वर संस्थान तळेगाव बाजार येथे श्री.सोमेश्वर महाराजांचे दर्शन आणि महाप्रसादाकरिता पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थांचे अध्यक्ष संतोषराव खारोडे,सर्व संचालक आणि गावकरी मंडळींनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!