ऑल इंडिया जमेतुल कुरेशी तेल्हारा तालुका ग्रामीण विभागाचे वतीने तहसीलदार यांना निवेदन.
कुरेशी समाजातील विविध समस्या सोडवण्याची मागणी.
ऑल इंडिया जमेतुल कुरेशी तेल्हारा तालुका ग्रामीण विभागाचे वतीने तहसीलदार यांना निवेदन.
कुरेशी समाजातील विविध समस्या सोडवण्याची मागणी.

महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समिती ही राज्यातील कायदेशीर पशु, व्यापार मास प्रक्रिया निर्यात व किरकोळ मांस विक्री व्यवसायाशी संबंधित लोकांच्या प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे अनेक पिढयापासुन आमचा समाज कायद्यानुसार पशु व्यापार व मास विक्री करत आहे परंतु अलीकडच्या काळात गंभीर समस्या भेडसावत आहे अशा आशयाचे आज ऑल इंडिया जमेतुल कुरेश तेल्हारा तालुका ग्रामीण विभागाचे अध्यक्ष शेख साजीद शेख नजीर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदना नुसार गैर कायदेशीर, तथाकथित लोकांकडून जबरदस्ती खोट्या एफ आय आर, हिंसाचार धमक्या देणे, संबधित अधिकारी व प्रशासनाकडून अनावश्यक त्रास,कागदपत्र असुनही व्यापारात अडथडे, यामुळे संपुर्ण समाज आर्थिक सामाजिक व मानसिक दडपणाखाली भविष्यातील असुरक्षिततेच्या भितीने ग्रस्त असुन आम्हाला आर्थिक व सामाजिक परिणाम सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्रात 60 लाखाहून अधिक कुरेशी समाज राहतो जो या व्यवसायावर अवलंबून आहे राज्याच्या जी एस डि पी ४ टक्के फक्त पशुसंवर्धन व मांस उघोगातुन रु 17-2 लाख कोटी दरवर्षी भैस मांस निर्यात एकट्या महाराष्ट्रातुन 10,300 कोटी पेक्षा अधिक कृषी अन्न निर्यातीपैकी 22 टक्के, भारत हा जगातील दुसरा सर्वात बिफ निर्यात करणारा देश असुन जेएनपीटी मुंबई हे महत्वाचे केंद्र आहे असे निवेदनात नमुद केले आहे.
निवेदनावर अध्यक्ष शेख साजीद शेख नजीर,उपाध्यक्ष शेख रफीक शेख तुकयी कुरेशी,सचिव शेख नवाब शेख मोहंमद कुरेशी, कोषाध्यक्ष शेख शहीद शेख बशीर, सदस्य शेख राजीक शेख अन्नु कुरेशी शेख जावेद शेख कहार कुरेशी, शेख शोयल शेख बशीर यांच्या स्वाक्षरी आहेत.