तेल्हारा येथील बुद्धीबळ पट्टू तन्मय मालवे राष्ट्रिय स्तरावर,सर्वच स्तरातून कौतुक.

तेल्हारा येथील तन्मय सुरेंद्र मालवे हा जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय येथील वर्ग 7 चा विद्यार्थी ह्याची बुद्धीबळ स्पर्धेमध्ये जे एन व्ही आंतर विद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेमध्ये राष्ट्रिय पातळीवर निवड झाली आहे.
तन्मय मालवे याने जिल्हा, विभाग, राज्य स्पर्धे मधून झेप घेत राष्ट्रिय पातळी गाठली आहे. तन्मय हा तेल्हारा येथील जिल्हा परिषद शिक्षक सुरेंद्र मालवे यांचा मुलगा असून त्यानें आपल्या तलख बुद्धिंमतेने राष्ट्रिय पातळी घाठली आणि आपले शहराचे नाव मोठें केले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त प्रशिक्षक खेडाळू बाळासाहेब बोदडे सर यांच्या सह आई, वडील यांना दीले आहे. तन्मय च्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.