आपला जिल्हा अकोला

तेेल्हारा नगर परिषद अंतर्गत ४ कोटी १७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते संपन्न.

निर्माणधीन शिवसृष्टी चे भूमिपूजन, पत्रकार भवन वाढीव काम लोकार्पण सह विविध कामांचा सहभाग.

तेेल्हारा नगर परिषद अंतर्गत ४ कोटी १७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते संपन्न.

निर्माणधीन शिवसृष्टी चे भूमिपूजन, पत्रकार भवन वाढीव काम लोकार्पण सह विविध कामांचा सहभाग.

तेल्हारा नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन आज दि. 24 जुलै रोजी दुपारी मतदारसंघ आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते संपन्न झाले यामध्ये संपूर्ण तेल्हारा शहरातील 4 कोटी 17 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमीपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात झाला.

विविध विकास कामा मध्ये तेल्हारा न.प. अंतर्गत पत्रकार भवनच्या वाॅलकंपाउंड चे बांधकाम व पेव्हर ब्लॉक लोकार्पण, तेल्हारा न.प. हद्दीत प्रभाग क्र.७ (जुना ) ओपन स्पेस मध्ये कंपाउंड वाल बांधकाम करणे., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना हद्दीतील इंदिरा नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तसेच वीर लहूजी साळवे सभागृह परिसरात पेव्हर ब्लॉक, कंपाउंड वाल बांधकाम करणे., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना न.प. तेल्हारा हद्दीतील इंदिरा नगर शहा ते तायडे ते राजगुर, गव्हाळे ते से.ब. शाळा नाल्यापर्यत कॉक्रीट नाली बांधकाम करणे., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरी, संत तुकाराम महाराज चौक ते बस स्टेंड येथील विद्युत वाहिनी स्थलांतरित करणे., वस्ती सुधार योजना जिल्हा वार्षिक नगरोत्थान योजना

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित, शिवसृष्टी करणे, तेल्हारा नगरपालिकेअंतर्गत नमो उद्यान विकसित करणे, प्रभाग क्र. १ व २ मध्ये पाटणे ते गोपाल तायडे ते गणेश मानकर उजैनकर ते जगन्नाथ बोळे गोपाल मलिये ते पंकज कांगटे विपूल मोरखडे ते शिवराज जामोदे कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे,प्रभाग क्र. ७ मध्ये गजानन खोपाले ते केशव पिंपळकार यांचे घरापर्यत व मारुती मंदिर ते महादेव मनसुटे यांचे घरापर्यंत कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे अशा विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मतदारसंघ आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी तेल्हारा नगर परिषद अध्यक्ष सौ. वैशाली जितेंद्र पालीवाल, उपाध्यक्ष सचिन तायडे, मुख्याधिकारी सतीश गावंडे सह गटनेते अतुल शंकरराव विखे,मंडळ अध्यक्ष गणेश रोठे- गजानन उंबरकर, केशवराव ताथोड,सरचिटणीस रामेश्वर हागे, सरचिटणीस रूपेश राठी, सरचिटणीस लखन बगाडे, कुलदीप तराळे, नगर परिषद सभापती सतिष जयस्वाल, अमित अग्रवाल, विजयसिंह बलोदे, सौ.गायत्रीताई सोळंके, सौ. साक्षीताई वानखडे, सौ.रुपालीलाई हागे, नगरसेवक रुपेश चव्हाण, जितेंद्र राठी,सौ. जयाताई बघ्घन, प्रविण डोके, संध्याताई गावत्रे, सौ. मोणीकाताई वाघ, सौ. भक्ती छांगाणी, सौ. कान्होपात्रा फाटकर, सौ. रिनाताई मुकेश आसरे, सौ. पंचफुला कंवर, राजेश रमेशराव खारोडे, गजानन गायकवाड सह तेल्हारा नगर परिषद चे सभापती, सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण शहरातील विविध विकास कामाचे सोहळ्यात स्थानिक नागरिक,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!