तेल्हाऱ्यात गुरुवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’.
तेल्हाऱ्यात गुरुवारी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर'.
तेल्हाऱ्यात गुरुवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार, गुरुवारी, ३० जुलै रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी तेल्हारा येथील तहसील कार्यालयात सोमवारी, २७जुलै दुपारी ३.३० वाजता विशेष आढावा बैठक व पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तहसीलदार महेश रामगुंडे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश काढले असून, तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विषयक अडचणी व प्रलंबित प्रश्नांचे एकाच छताखाली तातडीने निराकरण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम बनविण्यावर या शिबिराच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. सोमवारी होणाऱ्या आढावा बैठकीत गुरुवारच्या मुख्य शिबिराच्या रूपरेषेवर चर्चा होणार आहे.