तेल्हारा येथे पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात
मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचा उपक्रम.
तेल्हारा येथे पत्रकार दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पत्रकार दिन सोहळा सोमवार, ६ जानेवारी रोजी प्रबोधन कॉलनी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह, पत्रकार भवन, तेल्हारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी तालुक्यातील व परिसरातील जेष्ठ व अनुभवी पत्रकारांचा विविध स्मृती गौरव पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
स्व. भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार पत्रकार सत्यशील प्र. सावरकर यांच्या कडून श्री अशोक घाटे (दैनिक लोकमत, अडगाव बु.) यांना प्रदान करण्यात आला.
स्व. तात्यासाहेब शिंगणारे स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार सुरेशराव शिंगणारे यांच्या कडून श्री सापुर्डा राऊत (दैनिक लोकमत – देशोन्नती, पिंवदळ) यांना देण्यात आला.

स्व. संजयकुमार अहेरकर स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार अनंतराव अहेरकर यांच्या कडून श्री प्रमोद हागे (दैनिक देशोन्नती, दानापूर) यांना प्रदान करण्यात आला.
तसेच स्व. गुलाबरावजी खारोडे स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार सदानंद खारोडे यांच्या कडून पाथर्डी येथील जेष्ठ माजी पत्रकार श्री नारायणराव भिसे (दैनिक देशोन्नती) यांना देऊन गौरविण्यात आले.
स्व. अंगदलालजी चौधरी स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार धर्मेश चौधरी यांच्या कडून श्री अशोकराव गोयनका (जेष्ठ माजी पत्रकार, दैनिक तरुण भारत, तेल्हारा) यांना सन्मानित करण्यात आले.
स्व. जेठमलजी जोशी (तेल्हारा) स्मृती गौरव पुरस्कार पत्रकार अनिल जोशी यांच्या कडून श्री गजानन काकड (दैनिक लोकमत, सौंदळा) यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हादराव ठोकणे होते. यावेळी पत्रकारितेचे सामाजिक योगदान, लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका यावर विचार व्यक्त करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सन्मानित पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी तेल्हारा तालुका पत्रकार संघांचे प्रल्हाद ठोकणे, सुरेश शिंगणारे,अकोला जिल्हा सह चिटणीस सत्यशील सावरकर, अनंत अहेरकर, प्रा. कृष्णा फंदाट, रामाभाऊ फाटकर, सदानंद खारोडे, प्रशांत विखे,प्रा.विद्याधर खुमकर, अनिल अवताडे, निलेश जवकार, बसवेशवर आप्पा, रवि शर्मा, मधुकर मानकर, सुरेश सिसोदिया, संदीप सोळंके, सेवकराम हेरोडे, राहुल मिटकरी, विलास बेलाडकर, विशाल नांदोकार, सागर खराटे, संजय हागे आदी पत्रकार उपस्थित होते.
सोहळ्याचे यशस्वी आयोजन तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. संचालन धर्मेश चौधरी आभार प्रदर्शन अमित काकड यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.