माहे जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर.
माहे जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर.
माहे जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २२ अन्वये कलम १० मधील सुधारीत केलेल्या तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांकः रानिआ/मनपा-२००५/प्र.क्र.४/का.०५, दि. २७/०१/२००५ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीमध्ये, तिच्या क्षेत्रात व हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही आणि ज्याअर्थी, माहे जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी प्रभाग रचना करण्याबाबतच्या कार्यवाहीस तात्काळ सुरुवात करावी लागणार आहे आणि ज्याअर्थी, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना करण्याबाबतच्या कार्यवाहीस तात्काळ सुरूवात करावी लागणार आहे त्याअर्थी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १० मधील पोटकलम खंड (ब) नुसार मिळालेल्या व इतर अधिकारांचा वापर करुन ग्रामपंचायतींचे प्रभाग रचना करणे याकरीता राज्य शासनाकडून आदेश देण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम मध्ये प्रभाग रचना कार्यक्रमाचा टप्पा, कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक १
प्रारुप प्रभाग रचना तयार करणे,
1) तहसिलदार यांनी गुगलअर्थ चे नकाशे super impose करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे – २०/०२/२०२६
३) संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे. – २७/०२/२०२६
i) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभागरचनेची तपासणी करणे, सदर समितीमध्ये गटविकास अधिकारी व संबधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल.- ०५/०३/२०२६
iv) सदर समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करणे.- ११/०३/२०२६
v) जिल्हाधिकारी यांनी नमुना व (प्रारुप प्रभाग रचना) ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून सदर प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करणे. –१७/०३/२०२६
vi) राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यास प्रस्तावात दुरूस्ती करणे व त्यास मान्यता देणे. – २३/०३/२०२६
vi) या दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी. -३०/०३/२०२६
२-प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे –
i) प्रारुप प्रभाग रचनेला (नमुना ब) व्यापक प्रसिध्दी देऊन तहसिलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहिर सूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक ०७/०४/२०२६
ii) प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक १३/०४/२०२६
iii) प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे १६/०४/२०२६
iv) प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे २१/०४/२०२६
v) आलेल्या प्रत्येक हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे २३/०४/२०२६
प्रभाग रचना अंतिम करणे –
i) उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करुन राज्य निवडणूक आयोगास सादर करणे २८/०४/२०२६
ii) राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी (नमुना अ मध्ये) व्यापक प्रसिध्दी देणे ०४/०५/२०२६
अशा आशयाचे आदेश पत्र संबधित विभागामार्फत दिले गेले आहे.