माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांची केळी उत्पादक शेतकरी संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमताने निवड.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांची केळी उत्पादक शेतकरी संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमताने निवड.

दानापुर जि.अकोला येथील प्रयोगशील बागायतदार तथा अकोला जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांनी परिसरातील केळी पिकाचे उत्पादन वाढीसाठीचे प्रयत्न तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडुन त्याचे निरासरण करण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सुभाष रौंदळे यांची किरण चव्हाण (संस्थापक अध्यक्ष केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य) व सचिन कोरडे (समन्वयक केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य) यांनी अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली. हिंगणी बु. येथे पार पडलेल्या एका छोटेखानी समारंभात सुभाष रौंदळे यांना सचिन कोरडे यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष रौंदळे यांनी आपल्या निवडीसाठी किरण चव्हाण व सचिन कोरडे यांचे आभार व्यक्त करून आपल्या भागात केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी, तसेच केळी प्रक्रिया उद्योग व केळीपासुन बायप्रोडक्ट्स निर्मितीसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी राजेश वानखडे गुरुजी, दिगंबर ढगे साहेब, वैभव जवंजाळ, सचिन जोध, उत्कर्ष येवले,गोपाल येऊल, अशोक घायल, अक्षय बनकर, मंगेश मानकर, विकास जंजाळ, पवन गिऱ्हे, महेश मामनकर या केळी उत्पादक बांधवांची उपस्थिती होती.