अंदुरा येथील कावड यात्रेसाठी नदीपात्राच्या रस्त्यावर विद्युत प्रकाश व्यवस्थेची मागणी.
स्वराज्य पक्षाची निवेदनातुन मागणी.
अंदुरा येथील कावड यात्रेसाठी नदीपात्राच्या रस्त्यावर विद्युत प्रकाश व्यवस्थेची मागणी.
स्वराज्य पक्षाची निवेदनातुन मागणी.

तेल्हारा, दि. २९ अंदुरा येथील पुर्णाकाठी श्रावण महिन्यात आयोजित कावड यात्रेदरम्यान भोलेनाथांच्या भक्तांना सुरक्षितपणे नदीपात्रात उतरण्यासाठी पूर्णा नदीकाठावरील रस्त्यावर तात्पुरती विद्युत प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तहसीलदार यांचे कडे निवेदनातुन केली आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमधून भक्त कावड यात्रा काढून अंदुरा येथील पूर्णा नदीपात्रातून पाण्याने भरलेल्या कावडा घेऊन महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करीत असतात. ३ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १२ या वेळेत भक्त नदीकाठावर पाणी आणण्यासाठी जमणार आहेत. परंतु, नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अंधाराचे वातावरण निर्माण होते. सध्या सततच्या पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहत असल्याने अंधारात नदीपात्रात उतरणे धोकादायक ठरू शकते. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भक्तांच्या सोयी आणि सुरक्षिततेसाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरती विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. यामुळे भक्तांना सुरक्षितपणे नदीपात्रात उतरता येईल आणि कावड यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल. तहसीलदारांनी संबंधित विभागाला तातडीने निर्देश देऊन आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली. यावेळी गणेश आमले, आशिष शेळके, नितीन वाकोडे, लखन सोनटक्के, सचिन भागिंनकार, प्रतीक पाथ्रीकर ,सचिन गोरे, चेतन पिंपळकर यांचेसह बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.