शिक्षक बदलीत मंजूर पदापेक्षा जादा शिक्षक दिले. बदली पोर्टल मधील त्रुटीमुळे अनियमितता.
अनियमितता दूर करावी पुरोगामी शिक्षक संघटनेचे शासनास निवेदन.
शिक्षक बदलीत मंजूर पदापेक्षा जादा शिक्षक दिले.
बदली पोर्टल मधील त्रुटीमुळे अनियमितता.
अनियमितता दूर करावी पुरोगामी शिक्षक संघटनेचे शासनास निवेदन.
शैक्षणिक सत्र सुरु असताना राज्यात सुरु असलेल्या शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत बदली पदस्थापना देताना पोर्टलला मंजूर पदांचा विचार न झाल्याने काही शाळेत मंजूर पदापेक्षा जादा शिक्षकांना पदस्थापना दिली गेली आहे. पदच उपलब्ध नसताना पदस्थापना देणे ही बाब अनियमित असल्याने सदरची अनियमितता दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे केली आहे.
जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग 1 व संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया पूर्ण होवून प्रसिद्ध झालेल्या बदली याद्यामध्ये वरील बाब निदर्शनास आली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात संबंधित शाळेत मंजूर पदापेक्षा जादा पदस्थापना दिल्याने भविष्यात सदर शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे व विनाकारण शिक्षकांना आतरिक्त व्हावे लागणार आहे हा त्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे.
भविष्यात काही अडचण निर्माण होवू नयेत यासाठी सध्या अतिरिक्त असलेल्या पदावर जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत मंजूर पदापेक्षा जादा देण्यात आलेल्या पदस्थापना बदलून देण्यात याव्यात व पुढील टप्प्यात मंजूर पदापेक्षा जादा पदस्थापना होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश सासनकर, महिला राज्यध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, शंकर पवार, एस के पाटील, तुषार पाटील, विद्या कदम, अलका थोरात, पी आर पाटील, प्रमिला माने जिल्हाध्यक्ष संघर्ष सावरकर जिल्हानेते प्रशांत भारसाकळे,राज्य प्रतिनिधी प्रशांत शेवतकर,कार्याध्यक्ष अनिल ठाकरे,सरचिटणीस पंकज तांबळे,कोषाध्यक्ष विजय वाकोडे,उपाध्यक्ष मो.अवनर प्रविण डेरे आदींच्या सह्या आहेत.
अन्यथा न्यायालयात दाद मागणार –
सन 2024-25 ची अन्यायकारक संचमान्यता रद्द व्हावी यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेचा याचिका नं. WP17651 /2025 अन्वये मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढा सुरु आहेच. तसेच सदरची अनियमितता दूर झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार.
प्रसाद पाटील-
राज्यध्यक्ष- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना.