हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान 2025-26 तेल्हारा बस स्थानकाचा विभागात प्रथम क्रमांक.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान 2025-26 तेल्हारा बस स्थानकाचा विभागात प्रथम क्रमांक.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान 2025-26 तेल्हारा बस स्थानकाचा विभागात प्रथम क्रमांक.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान 2025-26 मध्ये “अमरावती विभाग” “क” वर्ग बसस्थानक मधून तेल्हारा बसस्थानकाचा “प्रथम” क्रमांक आला असून याबाबत महाराष्ट्रातील प्रादेशीक विभाग निहाय अ, ब, क, स्वच्छ बसस्थानक निकाल जाहीर करण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रादेशीक विभाग निहाय स्वच्छ बसस्थानक पुरस्कार अभियान राबविण्यात आले होते या मध्ये प्रादेशीक विभाग निहाय पुरस्कार योजना होती त्यामध्ये संभाजी नगर, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा विभागात हि स्पर्धा होती त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान 2025-26 असे नामांकन होते.


त्यामध्ये अमरावती विभागात अ दर्जा बसस्थानक मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, ब दर्जातील परतवाडा तर क दर्जात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक लागला आहे. तेल्हारा आगार प्रथम मिथुन शर्मा व आगारातील चालक, वाहक, अधिकारी व कर्मचारी कामगार तथा सर्व संघटना यांच्या अथक प्रयत्नानंतर हा पुरस्कार मिळाला असल्याने तेल्हारा आगाराचे सर्वत्र कौतुक व शुभेच्छा सह स्वागत होत आहे.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2026 अंतर्गत तेल्हारा बसस्थानकाला “क” वर्गातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून बक्षीस रक्कम रु 1,00,000/- पारितोषिक व प्रशस्तीपत्रक आज मा प्रादेशिक व्यवस्थापक अमरावती प्रदेश श्री पलंगे साहेब यांच्या हस्ते प्रादेशिक कार्यालय अमरावती येथे झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आले, यावेळी बक्षीस स्वीकारताना मिथुन शर्मा साहेब आगार व्यवस्थापक, श्री ठाकरे लिपिक, श्री गवई वाहतूक नियंत्रक, श्री गजानन काकड वाहतूक नियंत्रक इत्यादी.