आपला जिल्हा अकोलाधार्मिक

संस्काररत्न भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोत्साहात., नवधान्य , मिष्ठान्न, शर्करा , फळ व नाणे तुला.

      संतश्री वासुदेवजी महाराजांचे कृपांकित संस्काररत्न भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचा सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव पंचदिवशीय यज्ञानुष्ठान , वारकरी संत पंचकांच्या सामूहिक ग्रंथ पठणाने 

तसेच शेकडो आजी माजी विद्यार्थी, बहुसंख्य पालक व प्रेमीजन तसेच महंत स्वामी कृष्णानंद भारती महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व प्रा.श्रीयुत श्रीकांत महाराज भुस्कटे यांच्या पौरोहित्यात अवभृत स्नान, पंच बटु व गोमाता पूजन, ध्वजारोहण, पंचग्रंथ, नवधान्य , मिष्ठान्न, शर्करा , फळ व नाणे तुला आदि विविध धार्मिक विधीत बाळा, प्रौढा आणि मुग्धा यांच्या उपस्थितीत ब्रह्मकुमारी रक्ष्मी दीदी शुभहस्ते कुमकुम तिलक करून , पुरुषोत्तम मासातील गुरुपुष्यामृताच्या पर्वकाळावर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील शेकडो निरागस शिबिरार्थी व शिबिरार्थीनी स्नातकांनी समंत्रक सोत्साह संपन्न केला.

सदरहू कार्यक्रमाकरिता संत श्री सखाराम महाराज संस्थान इलोरा , मुक्ताई संस्थान मेहून , गुलाबराव महाराज संस्थान चांदूरबाजार आदि संस्थानांची विश्वस्त मंडळी तसेच महाराजांवर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक सदभक्त, विद्यार्थ्यांचे पालक व पंचक्रोशीतील लोक महाप्रसादाला बहुसंख्येने उपस्थित होते. असे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!