श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा थाटामाटात संपन्न.
माजी न्या. भूषण गवई; ना. नितीन गडकरी, ना. पंकज भोयर यांची उपस्थिती.
श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा थाटामाटात संपन्न.
माजी न्या. भूषण गवई; ना. नितीन गडकरी, ना. पंकज भोयर यांची उपस्थिती.

अमरावती : श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा रविवारी येथे दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठी उपस्थिती लाभली होती.

अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई होते, तर विशेष अतिथी म्हणून ना. नितीन गडकरी, ना. डॉ. पंकज भोयर, महापौर श्रीचंद तेजवाणी उपस्थित होते. व्यासपीठावर हर्षवर्धन देशमुख व त्यांच्या पत्नी निर्मला देशमुख, दिलीप इंगोले यांच्यासह खा. बळवंत वानखडे, आ. सुलभा खोडके, आ. संजय खोडके, आ. किरण सरनाईक, आ. प्रताप अडसड, आ. रवी राणा, आ. प्रवीण तायडे यांच्यासह माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, अनंत गुढे, वसंत खोटरे, गुलाबराव गावंडे, प्रीती बंड, सुरेखा ठाकरे, विलास इंगोले, नरेश पाटील, भैयासाहेब मेटकर आदी मान्यवरांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारावर श्री शिवाजी शिक्षण संस्था कार्यरत आहे. हर्षवर्धन देशमुख व दिलीपबाबू इंगोले यांनी या संस्थेचा गुणवत्तापूर्ण विकास केला. या दोघांचा राजकीय प्रामाणिकपणा दाद देण्यासारखा आहे. आयुष्यात संवेदनशीलता अत्यंत आवश्यक असून त्यांनी ती जपली. जशी जनता तसे नेते अशी स्थिती राजकारणाची आहे. स्मार्ट शहरे नाही तर गावे झाली पाहिजे. तोच संदेश देण्यासाठी नागपूरला भाऊसाहेबांच्या नावाने कृषी कॅनव्हेक्शन सेंटर तयार केले आहे. शेतकऱ्यांचे दुःख कमी व्हावे, यासाठीही शिवसंस्थेनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थाना वरून बोलताना माजी न्या. भूषण गवई म्हणाले, हर्षवर्धन देशमुख व दिलीपबाबू इंगोले यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. ते सदैव तरुणांसाठी प्रेरणादायी राहील. शिवाजी शिक्षण संस्थेला केंद्र व राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता भरभरून सहकार्य केले.

डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावे भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यात येईल असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.,देशाचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने अमरावती येथे एक भव्य व अद्ययावत ‘शैक्षणिक संकुल’ साकारले जाणार आहे. या संकुलामध्ये विभागातील सर्व प्रमुख शैक्षणिक कार्यालये एकाच छताखाली आणली जाणार असून, विभागासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. राज्य सरकारने आपल्या चालू अर्थसंकल्पात (बजेटमध्ये) या प्रकल्पासाठी विशेष आर्थिक तरतूद केली असल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन (भैयासाहेब) देशमुख आणि कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून बोलताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ही मोठी घोषणा केली.
तत्पूर्वी अमृत महोत्सवी सत्कारमूर्ती हर्षवर्धन देशमुख, त्यांच्या पत्नी निर्मला आणि दिलीपबाबू इंगोले यांचा भावपूर्ण सत्कार मान्यवारांच्याहस्ते झाला. सत्कारमूर्तीवर साकारलेल्या नेतृत्वदीप व समर्पित या दोन विशेषांकाचे प्रकाशन झाले व कार्यकर्तृत्वावरची चित्रफित दाखविण्यात आली. त्यांनी सत्काराला सविस्तर उत्तर दिले. प्रास्ताविक हेमंत काळमेघ, संचालन डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश मिरगे यांनी केले. आभार अॅड. गजानन पुंडकर यांनी मानले.
कार्यकमाला संस्थेचे आजीवन सभासद, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव – कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुख्य अतिथींच्या हस्ते भैयासाहेब देशमुख, त्यांच्या पत्नी निर्मला देशमुख आणि दिलीप इंगोले यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि जीवनपट – कार्यक्रमाची सुरुवात करताना शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ यांनी प्रास्ताविकातून दोन्ही सत्कारमूर्तीच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. या सोहळ्याचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते ‘गौरव ग्रंथा’चे विमोचन करण्यात आले. यानंतर मानपत्राचे वाचन करण्यात आले.