आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.,कित्येकांच्या घराचे छप्पर उडाल्याने संसार उघड्यावर.

तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.,कित्येकांच्या घराचे छप्पर उडाल्याने संसार उघड्यावर.

तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.,कित्येकांच्या घराचे छप्पर उडाल्याने संसार उघड्यावर.

तेल्हारा तालुक्यात 1 जुन रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेती पिकासह फळबागा उद्ध्वस्त झाल्या. तालुक्यात सर्वाधिक केळी पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येते. 

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावून होत्याचे नव्हते केले. शहरासह ग्रामीण भागात घराचे छतावरील टिन पत्रे उडाली तसेच रस्त्यावरील मोठ मोठी वृक्ष पडल्याने सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. काही भागात मोठे वृक्ष जिवंत विद्युत वाहिनीवर पडल्याने कुठेही जीवितहानी नसली तरी रोहित्राचे नुकसान झाले परिणामी विद्युत पुरवठा प्रभावित झाला.

 

तालुक्यात व शहरात तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेतातील फळपिकाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात बागायती क्षेत्र असल्याने बेलखेड, दानापूर, हिंगणी, तळेगाव, आकोली, हिवरखेड,खंडाळा, गोर्धा,माळेगाव, इसापूर, शेरी,रायखेड, कोठा, गाडेगाव, तेल्हारा शिवारात व तालुक्यातील इतरही भागात कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शक योजनेत केळी पिकांची लागवड नियोजन केले गेले होते.पिकाला भरमसाट खर्च करून पिक जोमात असताना तसेच पिक घडावर असताना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. केळी बरोबरच इतरही फळपिके व भाजीपाला पिकाची नासाडी झाली आहे.

वादळी वाऱ्यामुळे मोठ मोठी वृक्ष पडल्याने तालुक्यातील बऱ्याच गावात वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. परंतु वीज वितरण च्या कर्मचारी यांनी काही काळाने विद्युत पुरवठा सुरळीत चालू केला. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की,ग्रामीण भागात अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

बेलखेड, गाडेगाव तेल्हारा येथील केळी पिकांचे मोठे नुकसान शेतकरी निवेदन-

तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले याबाबत बेलखेड येथील शेतकरी रामा धुमाळे, गाडेगाव येथील उत्तम नळकांडे यांनी दिलेल्या निवेदनावरून बेलखेड येथील केळी उत्पादक शेतकरी मनोहर धुमाळे, गजानन धनभर,ब्रम्हदेव वानखडे, विजय नागपूरे, विठ्ठल वानखडे, संतोष बघेले, गणेश अढाऊ, सागर बागाणी, प्रशांत इंगळे, विठ्ठल जंवजाळ, गणेश वाकोडे, आकाश जंवजाळ, सागर वानखडे, सात्विक नागपूरे, निलेश नागपूरे,गाडेगाव येथील उत्तम नळकांडे,महेश वडतकार, शुभम वडतकार,शुभम वाकोडे,कैलास ठोकणे, रमेश राठी वाकोडी शिवार सुधाकरराव येवले व इतर शेतकऱ्यांचे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. या बाबत शासन स्तरावरून पाहणी करून मदत देण्याची मागणी केली आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!