कारगिल विजय दिनी तेल्हाऱ्यात मोटार सायकल रॅली व हुतात्मा सैनिकांना मानवंदना.
तेल्हारा तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे आयोजन.
कारगिल विजय दिनी तेल्हाऱ्यात मोटार सायकल रॅली व हुतात्मा सैनिकांना मानवंदना.
तेल्हारा तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे आयोजन.

तेल्हारा तालुका आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगील विजय दिनी तेल्हारा येथे शनिवार २६जुलै २०२५ रोजी सकाळी रॅली काढण्यात येऊन दुपारी १२ वाजता भागवत मंगल कार्यालयाच्या सभागृहात कारगिल युद्धातील वीरगती प्राप्त सैनिकांना मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दिवंगत सैनिकांच्या पत्नी, शहरातील गुणवंत विद्यार्थी, सेवाभावी कार्यकर्ते यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटना तेल्हाराचे विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस उपनिरीक्षक कापसे, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्य रंजना भागवत, गुरुकुल ज्ञानपीठाच्या वर्षा पारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शेगाव नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन, पुष्पार्पण, राष्ट्रीय स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हारअर्पण करण्यात येऊन भागवत मंगल कार्यालयातील सभागृहात संपन्न झालेल्या विशेष समारंभात कारगिल युद्धातील दिवंगत शहीद सैनिकांच्या शौर्याला
याप्रसंगी मानवंदना देण्यात आली. व भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच १९६५ व १९७२ च्या लढ्यातील माजी सैनिकांचा याप्रसंगी येथे सन्मान करण्यात आला. दिव्यांगत्वावर तसेच शारीरिक आजारांवर मात करून इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या भाविक धर्मेश चौधरी या इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा, वीरगती
प्राप्त सैनिक स्व. बाजीराव यांच्या धर्मपत्नी कल्पनाताई, शहीद स्व. भान्दास बोडीस्कर यांच्या धर्मपत्नी सरलाताई, सामाजिक कार्यकर्ता विकास पवार, पाथ्रीकर गुरुजी इत्यादी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शनिवार २६ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या या कारगिल विजय दिन स्मृती सोहळ्यास तेल्हारा शहरातील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ, सेठ बन्सीधर विद्यालय, गुरुकुल ज्ञानपीठ मधील विद्यार्थी, आजी माजी सैनिक परिवार, पत्रकार, सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रारंभी कु. दातकर, कु. दांदळे, कु. दुगाणे या विद्यार्थिनींनी गीत गायन केले. तर योगिता पाठक, रंजना भागवत वर्षा पारस्कर, पात्रीकर गुरुजी इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडगे, पांडुरंग खुमकर यांनी केले. दिनेश माकोडे यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.