जेष्ठ लेखिका डॉ प्रतिमा इंगोले यांची कांदबरी प्रकाशित.
विमोचन राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब हुसे यांच्या उपस्थितीत बालकुमारांच्या हस्ते.
जेष्ठ लेखिका डॉ प्रतिमा इंगोले यांची कांदबरी प्रकाशित.
विमोचन राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब हुसे यांच्या उपस्थितीत बालकुमारांच्या हस्ते.

महाराष्ट्राच्या ज्येष्ठ लेखिका डाॅ. प्रतिमा इंगोले यांची आठवी कादंबरी “पुराच्या वेढ्यात अभय” ही नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत बालकुमारांच्या हस्ते प्रकाशित झाली.
विदर्भातील सातपुडा कुशीत वसलेल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर सारख्या ग्रामीण भागात बालपण गेलेल्या प्रतिमा इंगोले यांना स्वातंत्र्य सैनिकी कौटुंबिक वारसा लाभला आहे. त्यांनी आज पर्यंत बऱ्याच कांदबरी,ललीत लेख संग्रह, कविता लिहिल्या व प्रकाशित सुद्धा केल्या आहेत. त्यांनी बाल कुमार साहित्य चे सुद्धा मोठ्या प्रमाणात लिखाण केले आहे. नुकतीच प्रकाशित ही एक रोमहर्षक व चित्तथरारक कादंबरी आहे. विशेष म्हणजे ती मुलांना पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रेरणा देणारी आणि संकटकाळी सर्वांना मदत करण्याचा संदेश देणारी कादंबरी आहे. ह्या कांदबरीचे विमोचन राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब हुसे विचारपीठावर उपस्थित असताना, बालमहोत्सवात बालकुमारांच्या हस्ते संपन्न झाली. हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालय, पुणे महानगर पालिका,संवाद संस्था पुणे, आणि नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली यांनी आयोजित केला होता. बाल कुमारांच्या गर्दीत पुराच्या वेढ्यात अभय या कादंबरी चे विमोचन होणे खूप वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष म्हणजे ही कादंबरी या महोत्सवात अनेकांनी खरेदी केली व आवडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.