श्री नाथ वृद्धाश्रम, दहीगाव येथे एकादशी निमित्त फराळ वाटप.
सोपान क्रीयेशनचा उपक्रम.

तेल्हारा तालुक्यातील श्री नाथ वृद्धाश्रम, दहीगाव येथे एकादशी निमित्ताने वृद्ध नागरिकांसाठी सात्विक आणि पौष्टिक फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील सर्व रहिवाशांना प्रेमपूर्वक आणि आदरभावाने अल्पोपहार देण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते आणि सोपान क्रीयेशन नेटवर्क चे संस्थापक सोपान मोहनराव गोमासे, कोटक सिक्युरिटीज चे ऑथोराइज्ड प्रतिनिधी अंकुश मेंढे, युवा सामाजिक कार्यकर्ते कुणाल हेरोडे, पंकज देव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजकांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांशी संवाद साधून हितगुज केली.
कार्यक्रमाच्या वेळी श्री नाथ वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धरमकर, अधीक्षक मनोज शर्मा, परिचारिका कु. शिल्पा जानराव गवई, सौ. लता प्रकाश मोगरे, सुरेंद्र सोळके, तसेच गावातील काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात एकादशीचे अध्यात्मिक महत्त्व विशद करण्यात आले आणि वृद्धांचा आशिर्वाद घेऊन, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.