आपला जिल्हा

तेल्हारा तालुका कृषी अधिकारी बनले तिफनकरी.

प्रत्यक्ष शेतात प्रायोगिक बियाणे पेरणी.

तेल्हारा तालुका कृषी अधिकारी बनले तिफनकरी.
प्रत्यक्ष शेतात प्रायोगिक बियाणे पेरणी.

तेल्हारा तालुक्यातील काही भागात पाणी पेरणी योग्य झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रायोगिक तत्त्वावर बियाणे वाटप करून तिफनकरी बनून पेरणी केली.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शेतकरी सौ. वैशाली सदानंद खारोडे यांच्या शेतात तेल्हारा तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी पेरणी सुरू होण्यापूर्वी सोयाबीन बियाणे वाटप करून बैलजोडी पेरणीवर तिफन हाकली. यावेळी तळेगाव बाजार चे कृषी सहाय्यक मनोज सारभूकन सुद्धा उपस्थित होते.तळेगाव शिवारातील उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांना सुद्धा बियाणे वाटप करण्यात आले. तेल्हारा तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत हे आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर येवून तिफनकरी बनल्याने परिसरातील शेतकरी यांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!