आंदोलनमहाराष्ट्र

पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेची कायदेशीर कारवाई ची मागणी.

पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेची कायदेशीर कारवाई ची मागणी.

पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेची कायदेशीर कारवाई ची मागणी.

मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीची दखल घेऊन संजय दिना पाटील याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे..संजय दिना पाटील यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे.. सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिसांसमोर त्यांनी ही धमकी दिली आहे हे अधिक गंभीर असून त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे..
संजय दिना पाटील आणि अन्य पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.. त्यासंदर्भात त्यांची भूमिका, मतं जनतेपर्यंत पोहोचविणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे.. त्यासाठीच पत्रकार संजय दिना पाटील यांच्या घरी गेले होते.. तेथे गेल्यानंतर काही अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील भडकले आणि त्यांनी पत्रकारांना शिविगाळ सुरू केली..
परत आलात तर मारून टाकील, घरासमोर उभे करतोय xxx मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका, माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा अशी अर्वाच्च, आणि अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली .. खासदाराला न शोभणारी ही भाषा संतापजनक आहे.. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत असे मत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे..
माझ्याकडे बॉम्ब आहे माझ्याकडं निदर्शनं करायला कोणी आलं तर बॉम्ब टाकेल, तसेच मी पाच खून केलेले आहेत अशी भाषा शिवसेनेला उद्देशून संजय दिना पाटील यांनी त्याअगोदर वापरली आहे.. एक खासदार माझ्याकडे बॉम्ब आहे अशी उघड धमकी देत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे, संजय दिना पाटलाकडे खरंच बॉम्ब आहे का? असेल तर तो कोठून आला? याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे..
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर , विश्वस्त किरण ना़ईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, डिजिटल मिडिया परिषदेचे अनिल वाघमारे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!