बाळापूर तालुका पत्रकार संघाचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार.
अकोला जिल्हा खासदार अनुप धोत्रे व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती.
बाळापूर तालुका पत्रकार संघाचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार.
अकोला जिल्हा खासदार अनुप धोत्रे व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती.

मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा बाळापूर तालुका पत्रकार संघाचे वतीने खिरपुरि येथील भाऊसाहेब तिरुख विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ३० गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कृषी,शिक्षण,व्यवसाय क्षेत्रात् उल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या व्यक्तींचा प्रमुख अतिथी खासदार अनुप संजय धोत्रे यांच्या हस्ते भेट वस्तू व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा पत्रकार संघा चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात ज्येष्ठ पत्रकार स्तंभ लेखक डॉ मोहन खडसे, पत्रकार संघाचे कार्यालयीन सचिव कमल किशोर शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक रौदले, कार्याध्यक्ष अमोल जामोदे, व तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी ,पत्रकार उपस्थित होते.
यावेळी समाज सेवक डॉ राजेंद्र तिरुख, युवा खासदार अनुप धोत्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला, विद्यालयाच्या प्राचार्या कल्पनाताई धोत्रे यांच्या सह भाऊसाहेब तिरुख महाविद्यालया च्या शिक्षक पियुष तिरुख व सर्व शिक्षक ,पत्रकारांनी या समारंभासाठी एकजूटीने प्रयत्न केले,कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा पाथ्रीकर यांनी केले.
दरवर्षी प्रमाणे बाळापूर तालुका पत्रकार संघाचा हा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सतत २१ वा सत्कार समारंभ होता हे येथे उलेखनीय सांगता येईल. समारंभाचे आयोजक रामदास वानखडे, रमेश ठाकरे,दीपक रोंदले ,अमोल जामोदे, उमेश जामोदे, डॉ अतिकूर रेहमान, दीपचंद चव्हाण, शाहबाज देशमुख व सर्व बाळापूर तालुका पत्रकार संघाचे सदस्य यांनी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.